बागलाची राई येथे आरती प्रभूंच्या आठवणींना उजाळा
⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाने व लेखिका वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून कवीवर्य आरती प्रभू (चि.त्र्यं.खानोलकर) यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २६ एप्रिल रोजी बागलाची राई या आरती प्रभूंच्या आजोळी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
