⚡मालवण ता.२८-: साळेल येथील देव गिरोबा मंदिरच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त २ मे रोजी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ८ वा. देव लिंगेश्वर मंदिरातून गिरोबा मंदिरकडे पालखीचे प्रस्थान, ९ वा. गिरोबा मंदिर येथे श्रींची पूजा, लघुरुद्र, अभिषेक व धार्मिक विधी, ११ वा. सत्यनारायण महापूजा व महाआरती, दुपारी १२.३० वा. पालखी प्रदक्षिणा, १.३० ते ३ वा. महाप्रसाद, २ पासून स्थानिक भजने, सायंकाळी ५.३० वा. आंबडोस कदमवाडीतील महिलांची फुगड़ी, ६ वा. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व गुणवंतांचा गौरव सोहळा, ७ वा. महाप्रसाद, रात्री ८ वा. छोट्या मुलांचे कलागुणदर्शक कार्यक्रम, ८.३० वा. महिलांचे विविध करमणुकीचे कार्यक्रम, १०.३० वा. एकांकिका- ‘आयडिया फेल,’ नंतर महिलांची एकांकिका ‘स्वस्त जावयांचा बाजार,’ ११.३० वा. विविधरंगी करमणुकीचे कार्यक्रम- शिवराज्याभिषेक, ग्रुप डान्स, सोलो वारकरी दिंडी, श्री स्वामी समर्थ प्रगट सोहळा, मिमिक्री आदी कार्यक्रम होतील. लाभ घ्यावा, असे आवाहन साळेल स्थानिक तसेच मुंबई निवासी ग्रामस्थांनी केले आहे.
