सिधुदुर्ग क्लासिक २०२३ शरीरसौष्ठव स्पर्धा ३० रोजी

⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला तालुका बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने सिधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ला विद्यार्थी मित्रमंडळाच्यावतीने श्री सातेरी व्यायामशाळेच्या २९व्या वर्धापनदिनानिमित्त सिधुदुर्गातील तिसरी मानाची ‘सिधुदुर्ग क्लासिक २०२३ शरीरसौष्ठव स्पर्धा‘ ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता साई दरबार हॉल, वेंगुर्ला येथे होणार आहे.

  तत्पूर्वी ५ ते ६ वाजेपर्यंत वजन तपासणी होणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५००, १०००, ७००, ५०० तसेच बेस्ट पोझर ७००, मस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर ७०० रुपये अशी बक्षिसे असून अंतिम विजेत्यास मानाचा किताब, चषक व रोख ५००० रुपये असे पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. अधिम माहितीसाठी हेमंत नाईक (९४२१६३११९०), अमोल तांडेल किवा संतोष परब यांच्याशी संफ साधावा.
You cannot copy content of this page