कु.सिद्धी संतोष हिवाळेकर व
कु.संकल्प रामचंद्र परब यांचे गुणवत्ता यादीत स्थान
⚡मालवण ता.२८‐: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एन एम एस परीक्षेत येथील सौ इं.द.वर्दम हायस्कूल कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु. संकल्प रामचंद्र परब व कु. सिद्धी संतोष हिवाळेकर यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. अनिल कांदळकर सर्व संस्था संचालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही एन कुंभार व श्री. कारंडे सर याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला आहे
