नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा उपक्रम; मोफत रक्तपुरवठा करणार
⚡कणकवली ता.२८-: कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून अजून एक नाविन्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रम राबवण्याचे जाहीर करण्यात आले आहे.कणकवली शहरातील कोणत्याही नागरिकाला अपघात किंवा अन्य कोणत्याही उपचारा च्या कारणासाठी रक्ताची गरज भासल्यास नियमानुसार रक्त पिशवीची शासकीय ठरवून दिलेली रक्कम नगराध्यक्ष स्वतः संबंधितांना देणार आहेत. व शहरातील गरज असलेल्या रुग्णाला हे रक्त पूर्णपणे मोफत पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगरपंचायतमध्ये पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे बोलत होते.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर,भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे,माजी नगरसेवक बंडू गांगण,महेश सावंत, सुशील पारकर, आदी उपस्थित होते.
नाविन्यपूर्ण उपक्रमातून राज्यभरात एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी हा उपक्रम सुरू करून मोठी गैरसोय दूर केली आहे. जेणेकरून कणकवली शहरातील नागरिकांना शासकीय नियमाप्रमाणे देय रक्ताची रक्कम भरणा करावी लागू नये व त्यामुळे कणकवली शहरातील रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांना अत्यावश्यक वेळी मोफत रक्तपुरवठा व्हावा हा यामागील उद्देश असल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांना अपघात, प्रसूती किंवा अन्य कोणत्याही उपचाराच्या कारणाकरिता रक्त आवश्यकता भासल्यास ओरोसमध्ये ब्लड बँकेत जावे लागते. याकरता शासकीय रक्कम भरणा करावी लागते. मात्र ही रक्कम भरणा करत असताना नागरिकांना हा आर्थिक ताण सहन करावा लागू नये या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री. नलावडे यांनी सांगितले. लोकाभिमुख कारभाराची जनतेला उणीव भासू नये व शहरातील जनतेने जो विश्वास ठेवून सत्ता दिली तो विश्वास सार्थ ठरावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असल्याचे नलावडे यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांनी शहरासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्या पाठोपाठ लोकाभिमुख काम करत राहणे हे आमचं पाऊल आहे. कणकवली शहरातील कोणत्याही नागरिकाला जर रुग्णालयात कुठेही उपचार करता रक्ताची आवश्यकता असल्यास थेट माझ्याशी (9420206464) या नंबर वर तसेच कणकवली भाजपाचे शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे (9422381900) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील श्री. नलावडे यांनी केले आहे.कोरोना काळात कोविड सेंटर बरोबरच कमळ थाळी व अन्य आरोग्य विषयक उपक्रम राबवताना,अंत्य विधीसाठी वैकुठरथ अशा सारखे नावीन्य पूर्ण उपक्रम राबविले होते.आता रक्तासारखा महत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुढाकार घेतला आहे.
