रानबांबुळी येथील रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद
⚡ओरोस ता.०६-: रक्तदान श्रेष्ठदान हा हेतू समोर ठेवून छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळी च्यावतीने रानबांबुळी प्राथमिक शाळा नंबर १ येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. छत्रपती प्रतिष्ठान युवा मंडळ रानबांबुळी हे मंडळ नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. यावेळी या मंडळाने रानबांबुळी प्राथमिक शाळा नंबर १ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते….
