⚡मालवण ता.०५-: डॉट कॉम असोसिएशन या परीक्षेमध्ये जि.प.प्राथमिक शाळा मसुरे कावा शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण १२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.
त्यातील ३ विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत आहेत.त्याना सन्मान चिन्ह , प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. नंदिनी अरूण आंबेरकर, रूद्र पंढरीनाथ मसुरकर, प्रांजल अरूण आंबेरकर यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. मुख्याध्यापिका सौ सुखदा मेहेंदळे, शिक्षक सुहास गावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
परीक्षेत सहभागी आणि उतिर्ण विद्यार्थ्यांचे आणि जिल्हा स्तरावर नैपुण्य दाखविलेल्या तिनही विद्यार्थ्यांचे शाळा समिती अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर, सौ सावली कातवनकर यांनी अभिनंदन केले आहे.
