Headlines

दळवी फाऊंडेशनचा जिल्हास्तरीय स्नेह मेळावा उद्या कुडाळात…

⚡सावंतवाडी ता.१७- : एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते शिक्षक बांधवांचा स्नेह मेळावा उद्या रविवार दिनांक १८ जून रोजी सकाळी अकरा वाजता कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित केला आहे. शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कार्यतत्पर असणाऱ्या एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या वतीने सातत्याने नवनवीन उपक्रम हाती घेऊन शिक्षकांचे उद्बोधन व प्रबोधन केले जात आहे….

Read More

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक सुभाष दळवी यांचा पिलर्स ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने गौरव

⚡सावंतवाडी ता.१७-: विलवडे गावचे सुपुत्र तथा स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक सुभाष दळवी यांनी आदर्श घन कचरा व्यस्थापन अर्थात पर्यावरण विषयक जनजागृतीच्या कार्यात महान योगदान दिल्याबद्दल त्यांना इंडियन इंडस्ट्रीज अँड इंटरप्रिनर्शिप फोरम व रेड एंट मिडियाचा यावर्षीचा ‘पिलर्स ऑफ महाराष्ट्र २०२३ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या…

Read More

दुग्धजन्य पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी दूध निर्मितीत वाढ आवश्यक

गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे नूतन चेअरमन अरुणराव डोंगळे यांचे प्रतिपादन ⚡कणकवली ता.१७-: जगभरातच दुधाची मागणी वाढत असून देशातील 140 कोटी लोकसंख्येसाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी दूध निर्मितीत वाढ करणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार प्रति मानसी प्रतिदिन 300 ग्रॅम दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सेवन करणे गरजेचे आहे. देशातील लोकसंख्येचा विचार करता…

Read More

मालवण – तारकर्ली देवबाग मार्गासाठी चार मिनीबस उपलब्ध व्हाव्यात – सुरेश बापार्डेकर

⚡मालवण ता.१६-: मालवण तारकर्ली देवबाग मार्गासाठी मालवण आगाराला चार मिनी बस उपलब्ध व्हाव्यात, जेणे करून मालवण बाजारपेठ मार्गे तारकर्ली बंदर, विठ्ठल मंदिर, देवबाग या मार्गावरून मिनीबस प्रवाश्यांच्या सेवेत राहतील. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन याबाबत विचार व्हावा, अशी मागणी तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबईचे सचिव सुरेश बापर्डेकर यांनी मुख्यमंत्री…

Read More

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

⚡मालवण ता.१६-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवतीसेना विस्तारक रुची विनायक राऊत यांच्या वतीने मालवण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल मधील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, अजय शिंदे, सुनील…

Read More

पोलीस विभागातर्फे 19 से 26 जून अंमली पदार्थ जनजागृती सप्ताह

पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: अंमली पदार्थाचे सेवन ही एक गंभीर समस्या बनली आहे. अंमली पदार्थामध्ये कोकेन, ब्राऊन शुगर हेरोईन चरस, एलएसडी, एमडीएमए, एमडीए, एसटीपी, मेफेड्रोन इत्यादी प्रमुख पदार्थाचा सामावेश होतो. अंमली पदार्थ्याच्या सेवनामुळे गंभीर स्वरुपाचे आजार उद्भवतात त्याचबरोबर ती पिढीही बरबाद होते. हे टाळण्यासाठी अंमली पदार्थ सेवन करु नये, यासाठी पोलीस विभागातर्फे दिनांक…

Read More

बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी आनंद बांदेकर नियुक्त झाल्याबद्दल त्यांचा विद्यार्थी मित्रांसाठी सत्कार

⚡वेंगुर्ले ता.१६-: वेंगुर्ले येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून डॉक्टर प्राचार्य आनंद बांदेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सण 1978-79 चा अभ्यास मधील विद्यार्थी मित्रांनी आज त्यांच्या निवासस्थाने भेट देत सालसेफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. हा गौरव ज्येष्ठ पुरोहित मित्र अरुण गोगटे यांच्या हस्ते शाल तर श्रद्धा आरेकर व प्रभा तेंडुलकर यांच्या हस्ते…

Read More

कुडाळात हाॅटेलमध्ये महिलेचा मृतदेह

⚡कुडाळ ता.१६-: कुडाळमधील एक नामांकित हॉटेल मध्ये मुंबईस्थित महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र ही आत्महत्या की घातपात? याबाबत उलटसूलट चर्चा सुरू असून कुडाळ पोलिसांना याचा शोध घेणे आव्हान आहे.कुडाळ शहरातील एका नामांकित हॉटेल मध्ये 40 वर्षीय मुंबईस्थित महिला मंगळवार दि. 13 जून पासून रूम नं. 208 मध्ये राहत होती. तिच्या लगतच रूम नं. 209 मध्ये…

Read More

वेंगुर्ला जुन्या तहसिलदार कार्यालयाच्या कागदपत्रांच्या चोरी प्रकरणी संवशयीतास जमीन मंजुर

वेंगुर्ले जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या बाजुला असलेल्या वेंगुर्ला तलाठी कार्यालयाच्या जुन्या स्टोरेज कॉटर्स मधून जमिनीचे फेरफार व महत्वाची सरकारी कागदपत्रे चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय होता,त्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखलकेलेला होता. परंतु दी. १३/०६/२०२३ रोजी संवशयित आरोपी ईश्वर छगन सापकाळे,रा. वेंगुर्ला याला पोलिसांनी अटक केलेली होती.आरोपी याचेतर्फे ॲड. अनिल निरवडेकर…

Read More

बावशी प्राथ. शाळा नं. १ शिक्षकाविना..

शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी दिले मागणीचे निवेदन ⚡कणकवली ता.१६-: विकासापासून कायमच वंचित राहिलेल्या बावशी प्राथमिक शाळा १ मधील शिक्षकाची बदली होऊनही पर्यायी शिक्षक न दिल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.या पार्श्वभूमीवर बावशी ग्रामस्थांनी तालुका शिक्षण विभागाला भेट देऊन शाळेत तातडीने नवीन शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी आपल्या मागणीचे निवेदनही शिक्षण…

Read More
You cannot copy content of this page