Headlines

कोळंब गावचा पाणीपुरवठा बंद…

सरपंच सीया धुरी:ग्रामस्थांनी नोंद घ्यावी.. मालवण : (प्रतिनिधी) कोळंब गावातील पाणीपुरवठा १ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला आहे. याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सरपंच सीया धुरी यांनी केले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नवीन कामगाराला गावातील काही व्यक्तींकडून पाणी सोडण्यावरून नाहक त्रास दिला जात होता. त्यामुळे संबंधित कामगाराने राजीनामा दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी…

Read More

कोळंब परिसरात बिबट्याचा वावर

वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा: ग्रामस्थांमधून मागणी.. ⚡मालवण ता.०२-: कोळंब खड़वण नाका परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचा संचार दिसून आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. कोळंब खडवण नाका परिसरात मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आणि शेतकरी कुटुंबे राहतात. याठिकाणी पाळीव जनावरेही मोठ्या…

Read More

मराठा समाज उपोषणकर्त्यांवरील लाठी चार्जविरोधात कणकवलीत सोमवारी निषेध मोर्चा…

सतीश सावंत :फडणवीस यांचा निषेध करण्याचे धाडस नितेश राणे यांनी दाखवावे… ⚡कणकवली ता.०२-: जालना येथील मराठा समाज उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि हवेतील गोळीबाराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाच्यावतीने निषेध करत असून याला लाठी चार्जच्या निषेधार्थ सोमवार 4 सप्टेंबर रोजी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मोर्चा काढत प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर करणार असल्याचे असल्याचे जिल्हा…

Read More

…तर मराठा समाजावर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

लाठीचार्जचे समर्थन कोणीच करू शकत नाही: आम.नितेश राणे ⚡कणकवली ता.०२-:मराठा आरक्षण हा विरोधकांचा मुद्दा नसून हिंदूंचे जनआक्रोश मोर्चे ही विरोधकांची पोटदुखी आहे. निर्दोष मराठा समाज आंदोलकांवर गुन्हे दाखल होऊ नयेत ही माझी मागणी आहे. मी स्वतः जालन्यात जाणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत जे दंगल होणार असे म्हणत होते ती हीच काय ? याची चौकशी…

Read More

ओटवणे रवळनाथ मंदिरात उद्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.०२-: ओटवणे येथील रवळनाथ मंदिरात रविवारी ३ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत आणि माजगाव विभागीय शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ओटवणे गावात प्रथमच जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा होत असुन या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. भजन स्पर्धेचे उद्घाटन दुपारी १ :३०…

Read More

मिळून साऱ्याजणी महिला मंचचा श्रावणसरी कार्यक्रम ठरला रंगतदार

⚡कणकवली ता.०२-:मिळून साऱ्याजणी महिला मंचतर्फे श्रावणसरी कार्यक्रम कणकवलीत खऱ्या अर्थाने रंगतदार ठरला.फुगड्यांचे विविध प्रकार, उखाणे, हळदी कुंकू सोबतच श्रावण महिन्यातील सण समारंभाचे वैज्ञानिक महत्त्व डॉ. वर्षा करंबेळकर -सावंत यांनी अतिशय नेटकेप्रमाणे विशद केले. शिवशक्ती हॉल,कनक नगर कणकवली येथे श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी काही आरोग्य विषयक सल्ले सुद्धा अतिशय नेटकेपनाणे दिले. या कार्यक्रमांतर्गत महिलांची…

Read More

सरिता पवार यांच्या काव्यसंग्रहाला बुलढाणा जिल्ह्यातील काव्य गौरव पुरस्कार

⚡कणकवली ता.०२-: कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला बुलढाणा जिल्ह्यातील मानव बहु सामाजिक संस्था डोणगाव यांचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 सप्टेंबर रोजी डोणगाव येथे सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण केले जाणार असून रोख रक्कम स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बुलढाणा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील हा अत्यंत मानाचा पुरस्कार असून…

Read More

मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०२-: मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या संकल्पनेतून दि.२८ व २९ अॉगस्ट रोजी मिलाग्रीस हायस्कूल च्या पटांगणावर पावसाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे यांच्या हस्ते झाले.मुलांच्या अंगी खिलाडू वृत्ती विकसित व्हावी व त्यांनी खेळातील आपले कसब सिद्ध करावे हा या…

Read More

“ऊरी पाऊस दाटला” गाण्यांच्या अल्बमचे 3 सप्टेंबर रोजी प्रकाशन

⚡कणकवली ता.०२-: पाऊस ही प्रत्येकाच्या मनातील एक हळवी गोष्ट !!पडणारा पाऊस सगळीकडे पडत असला तरी सुद्धा पावसाची आपल्यानुसार वेगवेगळे रूप प्रत्येक जण अनुभव असतो. पाऊस संगीत देतो, आनंद देतो हीच प्रेरणा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत प्रेमीनी “ऊरी पाऊस दाटला” या गाण्यांच्या अल्बमचे आयोजन केले आहे. या अल्बमचे प्रकाशन रविवार 3 सप्टेंबर रोजी आचरेकर प्रतिष्ठान कणकवली…

Read More

मतांच्या राजकारणासाठी भाजपाने सिंधुदुर्गमध्ये केली उत्तर भारतीय मोर्चाची स्थापना…

परशूराम उपरकर:शिरकाव सर्वपक्षीयांनी विरोध करून मोडून काढावा कणकवली 2 सप्टेंबर (प्रतिनिधी)-जी मुंबई मराठी, कोकणी माणसांची होती ती अशाच प्रकारच्या राजकीय मतांच्या बेरजेत परप्रांतीयांच्या ताब्यात गेली आहे. आता तर भाजपाने सिंधुदुर्गमध्ये उत्तर भारतीय मोर्चाची स्थापना करून कोकणातही ही संघटना स्थापन केली आहे. सिंधुदुर्ग असेल किंवा कोकण हे कोकणी माणसांचे असून तेथे अशा प्रकारे मतांच्या राजकारणासाठी केला…

Read More
You cannot copy content of this page