कोळंब गावचा पाणीपुरवठा बंद…

सरपंच सीया धुरी:ग्रामस्थांनी नोंद घ्यावी..

मालवण : (प्रतिनिधी)

कोळंब गावातील पाणीपुरवठा १ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला आहे. याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सरपंच सीया धुरी यांनी केले आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या नवीन कामगाराला गावातील काही व्यक्तींकडून पाणी सोडण्यावरून नाहक त्रास दिला जात होता. त्यामुळे संबंधित कामगाराने राजीनामा दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा बंद केल्याचे सांगण्यात आले.

You cannot copy content of this page