कोळंब येथे उद्या हिंदू धर्मप्रेमींची बैठक…

ग्रामस्थांनी उपस्थित राहवे:कोळंब ग्रामस्थांनचे आवाहन

मालवण : (प्रतिनिधी)

कोळंब गावात एकोपा निर्माण होऊन गाव एक संघ राहण्यासाठी सगळ्या वाड्यांमधील तरुणांसह सर्व ग्रामस्थ मिळून प्रभावी हिंदू संघटना निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी ३ सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी सायंकाळी वाजता कोळंब ७ मधलीवाडी येथील महापुरुष पार येथे धर्मप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना कोळंब ग्रामस्थांनी सांगितले, संघटनेचा उद्देश देशहित, धर्महित, गावचा विकास हा आहे. आज देश जिहादच्या विळख्यात सापडला आहे. लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, भूमी जिहाद, हलाल आदी जिहाद देशात सुरू आहेत. काश्मीरमधील हिंदू नरसंहार तसेच प. बंगाल, आसाम, केरळ येथे हिंदूंचा नरसंहार हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक, मंदिरांची तोडफोड, पाकिस्तानचे झेंडे फडकवून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. हे प्रकार भारताच्या प्रत्येक राज्यात घडतात. हिंदू एकसंघ नसल्याने असे प्रकार घडतात. हिंदू जातीभेद, वर्णभेद, प्रत्येकाचे वेगवेगळे राजकीय पक्ष, अनेक प्रकारच्या संघटना यामध्ये विभागला गेला आहे. काहींना वाटते, आमच्या गावात हिंदू संघटनांची काय गरज? तर त्यांना याची कल्पना नाही, की आमच्या गावातही धर्मांतराचा प्रकार घडलेला आहे. ही तर आमच्या धर्माविरोधी सुरूवात आहे. आमच्या गावात असे प्रकार पुन्हा घडू नयेत, म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. या बैठकीला ग्रामस्थांनी उपस्थित राहवे, असे आवाहन कोळंब ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page