डॉ. अजित पाटील:स. का. पाटील स महाविद्यालयातील मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..
मालवण (प्रतिनिधी)
"शेअर मार्केट चा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक शेअर मार्केट चा अभ्यास करावा आणि त्यातील विविध संधीचा लाभ घ्यावा. " असे प्रतिपादन डॉ.अजित पाटील यांनी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशन, आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी “सेबी आणि सी.डी.एस.एल. यांची ओळख व कार्य” या विषयावर मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयातील नरहरी प्रभु झांट्ये सभागृहात संपन्न झालेल्या या सत्रांमध्ये महाविद्यालयातील ८३ विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
डॉ. सुमेधा नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्य. डॉ शिवराम ठाकूर यांच्या हस्ते प्रमुख मार्गदर्शक डॉ. अजित पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सी.डी.एस.एल. च्या वतीने डॉ. अजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना सेबीची कार्ये, सी.डी.एस.एल. ची कार्ये, शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवताना घ्यायची सावधानता, फसवणुकीबाबत सेबीची भूमिका इत्यादी बाबत स्लाईड शोच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांचे शंका निरसन केले.
विद्यार्थी दत्ता मालाडकर याने आभार मानले. यावेळी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, डॉ. डी. व्ही. हारगिले, डॉ. एम. आर. खोत, प्रा. बी. एच. चौगुले, डॉ सुमेधा नाईक, प्रा. प्रमोद खरात, प्रा. संग्रामसिंह पवार इत्यादी उपस्थित होते. कॉमर्स असोसिएशन, आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग व अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक, तसेच विद्यार्थी व्यवस्थापक प्रणिता गोसावी आणि हर्षाली कांदळगावकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
