देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे…

विजय चव्हाण: वेताळ बांबर्डे आयोजित श्रावणमेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡कुडाळ ता.०२-: देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज वेताळ बांबर्डे येथे आयोजित श्रावणमेळा २०२३ या कार्यक्रमात केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, पोलिस पाटील दिपाली कुबल, ग्रा. सदस्य दशरथ कदम, ग्रा. सदस्य
साजुराम नाईक, ग्रा. सदस्य
शैलेश घाटकर, ग्रा. सदस्या
समृध्दी कदम, ग्रा. सदस्या
रश्मी तिवरेकर, ग्रा. सदस्या
सुदिव्या सामंत, ग्रा. सदस्या सृष्टी सावंत, ग्रा. सदस्या जागृती गावडे, ग्रामसेवक पिंटो, सुप्रिया पवार, स्नेहा दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले की, वेताळ बांबर्डे गावातील
महिलांची ऊर्जा कायम असून यापूर्वी २०१७ मध्ये आपण येथे प्रथम आलो त्यावेळी सुद्धा असेच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. देशाची लोकशाही बळकट होण्यासाठी महिलांनी सक्षम व्हावे असे आवाहन सुद्धा यावेळी विजय चव्हाण यांनी केले. देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे असून तरच आपण विकासाकडे पाऊल टाकू शकतो असे ते म्हणाले.
तर जिल्ह्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर म्हणाले की, आजच्या व्हाट्सॲपच्या जमान्यात असे कार्यक्रम होणे ही कौतुकास्पद बाब असून अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण हे असे उपक्रम नेहमीच राबवत असतात. मात्र, भविष्यात आणखी एक गटारी हा कार्यक्रम एक इव्हेंट व्हावा अशी अपेक्षा यावेळी विनायक ठाकूर यांनी व्यक्त केली.
श्रावणमेळा या कार्यक्रमाद्वारे गावातील एकी दिसून येते. अशा कार्यक्रमांना एकत्र येणे गरजेचे असून ग्रामपंचायतीत लोकांचा १०० टक्के सहभाग असणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा नावलौकिक होतो. मात्र, गावातील लोक विभागले गेले असल्यास त्यामुळे एकमत होत नाही. यामुळे गावचा विकास होण्यास अंकुश बसतो, असेही विनायक ठाकूर यावेळी म्हणाले.
गावातील कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा असतो. महिलांकडे प्रचंड ताकद असून ती केवळ कुटुंबासाठी न वापरता गावासाठी वापरावी असे आवाहनही विनायक ठाकूर यांनी यावेळी केले. या श्रावणमेळ्यात रानभाज्या आणि पाककला, उखाणा स्पर्धा, खेळ पैठणीचा, पारंपरिक फुगडी यांचे विशेष आकर्षण ठरले. तर या श्रावणमेळ्यात प्रसिद्ध निवेदक बादल चौधरी यांनी खास मालवणी भाषेतून निवेदन केले.

You cannot copy content of this page