वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा: ग्रामस्थांमधून मागणी..
⚡मालवण ता.०२-: कोळंब खड़वण नाका परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचा संचार दिसून आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कोळंब खडवण नाका परिसरात मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आणि शेतकरी कुटुंबे राहतात. याठिकाणी पाळीव जनावरेही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी बिबट्याच्या वावराने ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहत आहेत. ग्रामस्थांनीच “इतरांना आपल्या कुटुंबातील सदस्यांची व जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वन विभागाने तातडीने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे.
