…तर मराठा समाजावर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

लाठीचार्जचे समर्थन कोणीच करू शकत नाही: आम.नितेश राणे

⚡कणकवली ता.०२-:
मराठा आरक्षण हा विरोधकांचा मुद्दा नसून हिंदूंचे जनआक्रोश मोर्चे ही विरोधकांची पोटदुखी आहे. निर्दोष मराठा समाज आंदोलकांवर गुन्हे दाखल होऊ नयेत ही माझी मागणी आहे. मी स्वतः जालन्यात जाणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत जे दंगल होणार असे म्हणत होते ती हीच काय ? याची चौकशी झाली पाहिजे. छत्रपती संभाजी राजेंनी जालन्यात पहिला दगड कोणी मारला ? याची माहिती घ्यावी. मराठा समाजाला माझे आवाहन आहे की फडणवीस सरकारनेच आपल्याला आरक्षण मिळवून दिले होते. राज्यातील युती सरकार हे मराठा समाजाविरोधात नाही. हा लाठीचार्ज मस्ती करून अधिकाऱ्यांनी केला असेल तर त्यांच्यावर आमचे सरकार कारवाई करणार असे आम.नितेश राणे यांनी सांगितले.

जालनामध्ये काल मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जचे समर्थन कोणीच करू शकत नाही. हा लाठीचार्ज मस्ती करून अधिकाऱ्यांनी केला असेल तर त्यांच्यावर आमचे सरकार कारवाई करणार. फडणवीस यांनी याची उच्चस्तरीय चौकशी लावली आहे. शिवबा संघटनेचे पाटील मराठा आरक्षण साठी सतत प्रयत्न करत आहेत. पाटील यांच्यावर मागे झालेल्या केस वेळी माजी खा. निलेश राणेनी त्यांना सहकार्य केले आहे. मराठा समाजाचे आजवर 58 मोर्चे शांतपणे निघाले आहेत. मग जेव्हा जालनातील या मोर्चावेळी पोलिसांवर दगडफेक मराठा समाजातील तरुणांनी केली असेल असे मला वाटत नाही. मराठा समाजाला बदनाम कोणाला करायचे आहे ? मराठा आरक्षण राणे समितीने दिले आणि देवेंद्र फडणवीस यांनी ते टिकवले. कालपासून फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना ठाकरे सरकारने कोर्टात चांगला वकील न देता मराठा आरक्षण ची वाट लावली. मराठा समाजाच्या माता भगिनींना मुका मोर्चा म्हणून डिवचले होते. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी मंत्री असताना मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावून दिले. वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावर बोलूच नये. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बस जाळपोळ मागे कोण आहेत ? यविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय रघुनाथ शिंदे याचे नाव यात पूढे येत आहे. उबाठा सेनेचे नेतेच या दंगली घडवत असल्याचा संशय यात आहे. हिंदुंच्या जाती जातीत वाद लावून जिहादी ना पोसायचे विरोधकांचे धंदे आहेत. असे आम.नितेश राणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page