⚡कणकवली ता.०२-:
मिळून साऱ्याजणी महिला मंचतर्फे श्रावणसरी कार्यक्रम कणकवलीत खऱ्या अर्थाने रंगतदार ठरला.फुगड्यांचे विविध प्रकार, उखाणे, हळदी कुंकू सोबतच श्रावण महिन्यातील सण समारंभाचे वैज्ञानिक महत्त्व डॉ. वर्षा करंबेळकर -सावंत यांनी अतिशय नेटकेप्रमाणे विशद केले.
शिवशक्ती हॉल,कनक नगर कणकवली येथे श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी काही आरोग्य विषयक सल्ले सुद्धा अतिशय नेटकेपनाणे दिले.
या कार्यक्रमांतर्गत महिलांची उत्स्फूर्त फुगडी, उखाणी हे मुख्य आकर्षण होते. भारतीय संस्कृतीप्रमाणे श्रावण महिन्याचे महात्म्य, श्रावणातील व्रतवैकल्ये, त्यांचे सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व पटवून सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन सौ.समृद्धी संदेश पारकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी कणकवली शहरातील महिला वर्ग तसेच देवगड,नाटळ, फोंडा, जानवली, कलमठ, शिरवल येथूनही महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समृद्धी पारकर, नीलम सावंत -पालव ,शिल्पा सरूडकर, विना राणे, भाग्यश्री रासम,शितल पारकर, संजना साटम,, पुनम म्हापसेकर, रीमा साटम, दिव्या साळगावकर,रोहिणी पिळणकर,नेहा पारकर, श्वेता घाणेकर, अमिता सावंत,राधिका पालव, ज्योती मुणगेकर सुप्रिया सरंगले, गौरी पिळणकर, शाली पिळणकर,प्रतिभा सावंत ज्योती सावंत दिशा कांबळे विशाखा कांबळे यांनी मेहनत घेतली.
