Headlines

आचरा येथील राखी बनवणे स्पर्धेत भक्ती कानविंदे प्रथम

सिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्तविद्यमाने स्पर्धेचे आयोजन… ⚡मालवण ता.०३-: सिरॉक ग्रुप आचरा व “रंगभूमी गावातली” यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधननिमित्त आचरा पंचक्रोशी अंतर्गत भव्य “राखी बनविण्याची स्पर्धा”आयोजित केली होती या स्पर्धेत प्रथम क्रमांक भक्ती कानविंदे, द्वितीय क्रमांक दिव्या गावकर, तृतीय क्रमांक श्रुती जाधव, विशेष लक्षवेधी राखीचे पारितोषिक स्वराली आचरेकर यांनी प्राप्त केले. विजेत्यांना…

Read More

कांदळगाव येथील नारळ लढविणे स्पर्धेत अंकुश सावंत विजयी…

⚡मालवण ता.०३-: भाजप कांदळगावच्यावतीने कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत अंकुश सावंत (कांदळगाव) हे विजयी झाले. तर जयेश शिरपूटे (मालवण) हे उपविजेते ठरले. या स्पर्धेत ८० जणांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्या कांदळगाव येथील अंकुश सावंत यांना रोख ६६६६ रुपये व चषक तर उपविजेत्या मालवणच्या जयेश शिरपूटे याला रोख रु. ३३३३…

Read More

कणकवलीतील मराठा समाजाच्या मोर्चाला ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा…

रुपेश पावसकर:राज्य सरकारकडून ही हिटलरशाही सुरू आहे.. कुडाळ ता.०३-: जालना येथे मराठा समाजाच्या बांधवांवर जो लाठीचार्ज झाला त्या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी समाजाकडून निषेध करण्यात आला आहे. याबाबत शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारकडून ही हिटलरशाही सुरू असून भविष्यात आरक्षणासाठी होणारी अन्य समाजाची आंदोलनेही दडपण्याचा प्रकार राज्य सरकारकडून केला…

Read More

मराठा समाजाने संयम बाळगत महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा

प्रभाकर सावंत:दोषींवर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितच कडक कारवाई करतील… ⚡ओरोस ता.०३-: जालन्यातील दुर्दैवी घटनेबद्दल मी तातडीने प्रतिक्रिया देण टाळले. कारण मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीतील मी एक जबाबदार घटक आहे. तसेच त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून मी पाहत नाही. मी स्वतः अनेक मराठा मान्यवरांसह सकल मराठा समाज मोर्चासाठी तळमळीने सामील झालो असलेने मला त्या प्रश्नांची जाण आहे. झालेली…

Read More

वैभववाडी येथे एक महिनाभर मोफत रेडीमेड गारमेंट प्रशिक्षण

⚡वैभववाडी ता.०३-: वैभववाडी येथे एक महिनाभर जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत रेडीमेड गारमेंट (फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण )सुरू करण्यात येणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण पुणे मोफत असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र व विद्यावेतन १००० रुपये देण्यात येणार आहे. तरी ज्या लाभार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरायचे असतील अशांनी सोमवार दिनांक 4 सप्टेंबर…

Read More

यशस्वी चांद्रयान मोहिमेत सिंधुदुर्गवासीय सुहास शिरोडकर यांचा सहभाग

⚡कणकवली ता.०३-:भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केलेल्या यशस्वी चाऺद्रयान मोहिमेमुळे भारताची साऱ्या जगात वाहवा झाली. भारताने आपले चांद्रयान चऺद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविले आणि असे करणारा भारत हा पहिला देश ठरला. या यशस्वी मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोरे गावचे सुहास शिरोडकर यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. या त्यांच्या देशसेवेबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. चाऺद्रयान ३ मोहिमेसाठी गेली तीन…

Read More

कुंभार समाज भवन बांधकाम कमिटी अध्यक्षपदी यशवंत शेदुलकर…

⚡कणकवली ता.०३-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांचे ओरोस येथे कुंभार समाज भवन लवकरच उभे राहणार आहे. यासाठी नव्याने बांधकाम कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या अध्यक्षपदी यशवंत शेदुलकर यांची निवड करण्यात आली आहे. संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. श्री. शेदुलकर हे महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून काम करत…

Read More

तळेरे हायस्कूलमध्ये “कापडी पिशवी घरोघरी,पर्यावरणाचे रक्षण करी” अभियान…

५०० कापडी पिशव्या तयार करून तळेरे परिसरात वाटप: जनजागृती फलक, घोषणांनी संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला.. ⚡कणकवली ता.०३-: वामनराव महाडिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरेमध्ये स्काऊट गाईड विभागामार्फत व कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थी, पालक व वर्गशिक्षक यांच्या सहाय्याने कापडी पिशव्या तयार करून परिसरात वाटप करण्यात आल्या. यावेळी पंचायत समिती कणकवलीच्या सर्व शिक्षा अभियानाचे सचिन तांबे,प्राचार्य अविनाश मांजरेकर,शाळा…

Read More

मराठा सकल समाज्याच्या वतीने इन्सुली येथे सरकारचा निषेध…

सरकारविरोधात घोषणाबाजी: अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचे देखील मोठी उपस्थिती.. बांदा ता.०३-: जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज इन्सुलीच्या वतीने इन्सुली येथे राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य…

Read More

आरोंदा तंटामुक्त अध्यक्षपदी रामचंद्र कोरगावकर…

सावंतवाडी ता.०३-:आरोंदा तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी रामचंद्र (प्रंशात कोरगाव यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली. श्री कोरगाव हे गावच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. शिवाय ते आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कार्यकारणीत संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read More
You cannot copy content of this page