कुंभार समाज भवन बांधकाम कमिटी अध्यक्षपदी यशवंत शेदुलकर…

⚡कणकवली ता.०३-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांचे ओरोस येथे कुंभार समाज भवन लवकरच उभे राहणार आहे. यासाठी नव्याने बांधकाम कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या अध्यक्षपदी यशवंत शेदुलकर यांची निवड करण्यात आली आहे. संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

श्री. शेदुलकर हे महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. सिंधुदुर्गात कुंभार समाजाचे भवन व्हावे ही त्यांचीच संकल्पना आहे. समाजभवनाला जागा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शेदुलकर राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करीत असून ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षपदी भूषविले आहे. महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शेदुलकर यांनी अनेक वर्षे काम केले आहे. त्यांना शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कारही मिळाला आहे. समाजासाठी सातत्याने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून कुंभार समाज मुंबईतर्फे समाज गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आता समाज भवनाच्या बांधकाम कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page