Headlines

नियमांच्या उल्लंघन प्रकरणी 32 वाहनधारकांवर कारवाई

⚡वेंगुर्ला ता.१४-: मोटर व्हेईकल अँक्टचे उल्लंघन करणा-या 32 जणांवर पोलीसांकडून कारवाई करत न्यायालयात पाठविण्यात आलेल्या संबधितांवर दंडात्मक कारवाई करून दंड जमा करण्यात आला आहे. वेंगुर्ला तालुक्यात वाहातुक नियमांचे उल्लंघन करणा-यांवर वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक पोलीस मनोज परूळेकर व गौरव परब यांनी कारवाई केली. या कारवाईत रहदारीला अडथळा केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता…

Read More

तृणधान्य पाककला स्पर्धेत दर्शना नानचे तालुक्यात प्रथम

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला पाटकर हायस्कूल येथे तृणधान्यावर आधारित पार पडलेल्या तालुकास्तरीय पाककला स्पर्धेत दर्शना निलेश नानचे (परुळे) यांनी बनविलेल्या ‘ज्वारीचे आप्पे‘ या पाककृतीला प्रथम, प्राची प्रविण मेस्त्री (आरवली) यांनी बनविलेल्या ‘भरडधान्य थाळी‘ याला द्वितीय तर डॉ.सई संजिव लिगवत (वेंगुर्ला) यांनी बनविलेल्या ‘तृणधान्य कबाब‘ या पाककृतीला तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेचे परीक्षण मॅक्स फुड लॅब वेंगुर्ल्याचे संचालक…

Read More

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रथमेश तेल यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.१४-: येथील भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रथमेश तेली यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read More

कणकवली बस स्थानकातील दुरावस्थेचे काम पूर्ण न झाल्यास युवासेनेमार्फत आंदोलन

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा ⚡कणकवली ता.१४-: येत्या दोन दिवसात कणकवली बस स्थानकातील दुरावस्थेचे काम पूर्ण न झाल्यास युवासेनेमार्फत तीव्र आंदोलन छेडले जाईल. सर्वसामान्य जनतेला गणेश चतुर्थीपूर्वी खड्डेमुक्त बसस्थानक मिळाले पाहिजे. अन्यथा गय केली जाणार नाही असा देखील इशारायुवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला. यावेळी जोपर्यंत ठेकेदाराकडून निविदे प्रमाणे काम पूर्ण होत नाही…

Read More

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाला देणार भेट…

रुग्णवाहिकाही देणार:संचालक उमाकांत वारंग यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.१४-: येथील राणी जानकीबाई साहेब सुतिकागृह संचलित भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाला सर्व सोयीने युक्त अत्याधुनिक अशी रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यानी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिलेतर येत्तया ऑक्टोबर महिन्यामध्ये आयुर्वेद महाविद्यालयाला भेट देण्यासाठी ते सावंतवाडीत येणार असल्याचेही संस्थेचे संचालक उमाकांत वारंग यांनी सांगितले. सावंतवाडी…

Read More

जिल्हा बँकेला बँको ब्ल्यू रिबन २०२३ पुरस्कार जाहीर…

देशापतीवरील या पुरस्कार बँकेने आठ वेळा मारली बाजी:अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ⚡ओरोस ता १४-: कोल्हापूर येथील अविज पब्लिकेशन या सहकार क्षेत्रातील राष्ट्रीय संस्थेकडून दिला जाणारा देश पातळीवरील बँको ब्ल्यू रिबन २०२३ हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर झाला आहे. बँकेला हा आठव्या वेळी पुरस्कार जाहीर झाला असल्याचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी…

Read More

सावंतवाडी मार्गे ओरस वर्दे बस फेरी नियमित करा…

वर्दे ग्रामपंचायतची मागणी ; आगार व्यवस्थापकाकडे लेखी निवेदन ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी आगारातून सोडण्यात येणारी सावंतवाडी ओरोस मार्गे व वरदे ही बस फेरी गणेशोउत्सव कालावधीत नियमित करावी, अशी मागणी वर्दे ग्रामपंचायतच्या वतीने सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.सदरचे निवेदन वर्दे गावचे ग्रामस्थ लक्ष्मण उर्फ आजा कदम यांनी बुधवारी आगार व्यवस्थापक…

Read More

कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची 15 रोजी सभा

⚡कणकवली ता.१४-: कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या कार्यकारणीची सभा शुक्रवार 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 10.30 वा. संस्थेच्या पेन्शनर भवन, कलमठ येथे कार्यालयात बोलवण्यात येत आहे. सभेत पेन्शन संबंधात महत्त्वाच्या कामकाजावर चर्चा होणार आहे असे . तरी कार्यकारणी सर्व सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी केले आहे.

Read More

उद्धव ठाकरे यांची जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतली सदिच्छा भेट

⚡कणकवली ता.१४-: शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर संदेश पारकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेवुन आशिर्वाद घेतले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना संघटना वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हाप्रमुख पदाचा वापर सर्वसामान्य जनतेला न्याय देवुन निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे वचन यावेळी श्री.पारकर यांनी श्री.ठाकरे यांना दिले.

Read More

कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पूरस्कारप्राप्त विद्यालय सावंतवाडी शाळा नं ६ मध्ये तृणधान्य पाककृती कार्यक्रम साजरा…

⚡सावंतवाडी ता.१४-: येथील सावंतवाडी नं.6 या शाळेत तृणधान्य व कडधान्य पाककृती चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्व पालकांनी उत्कृष्ट पाककृती सादर केल्या होत्या त्यामध्ये ज्वारी ची भाकरी व अळू भाजी,झुणका व भाकरी पुरणपोळी, बेसन लाडू, पुरी भाजी, कच्च आलू, शिरा, नाचणी भाकरी व भाजी, खास्ता, आंबोळी व उसळ, साबुदाणा वडे, चपाती व भाजी. इ….

Read More
You cannot copy content of this page