सावंतवाडी मार्गे ओरस वर्दे बस फेरी नियमित करा…

वर्दे ग्रामपंचायतची मागणी ; आगार व्यवस्थापकाकडे लेखी निवेदन

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी आगारातून सोडण्यात येणारी सावंतवाडी ओरोस मार्गे व वरदे ही बस फेरी गणेशोउत्सव कालावधीत नियमित करावी, अशी मागणी वर्दे ग्रामपंचायतच्या वतीने सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
सदरचे निवेदन वर्दे गावचे ग्रामस्थ लक्ष्मण उर्फ आजा कदम यांनी बुधवारी आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

सावंतवाडी आगरातून अनेक वर्षापासून सावंतवाडी ओरोस मार्गे वरदे ही बस फेरी सुरू आहे. सदरची बस सध्या वरदे रमाबाई नगर येथे शेवटचा स्टॉप घेते.

तसेच शनिवार व रविवार या दोन दिवशी ही बस फेरी बंद ठेवण्यात येते. परंतु काही दिवसावर गणेश चतुर्थी सण जवळ आल्याने अनेक चाकरमानी व भावीक मुंबई, पुणे आदी लांबच्या जिल्ह्यातून व शहरातून गावी येणार आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सदरची बस फेरी वरदे कोकेमळावाडी व गावठणवाडी पर्यंत नियमित सुरू करावी. आपल्या मागणीची दखल घेऊन लवकरच सदरची बस फेरी नियमित करून गावठण वाडी पर्यंत सोडण्यात येईल असे आश्वासन आगार व्यवस्थापक निलेश गावित यांनी ग्रामस्थ आजा कदम यांना दिले. यावेळी स्थानक प्रमुख विशाल शेवाळे उपस्थित होते.

You cannot copy content of this page