⚡सावंतवाडी ता.१४-: येथील सावंतवाडी नं.6 या शाळेत तृणधान्य व कडधान्य पाककृती चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्व पालकांनी उत्कृष्ट पाककृती सादर केल्या होत्या त्यामध्ये ज्वारी ची भाकरी व अळू भाजी,झुणका व भाकरी पुरणपोळी, बेसन लाडू, पुरी भाजी, कच्च आलू, शिरा, नाचणी भाकरी व भाजी, खास्ता, आंबोळी व उसळ, साबुदाणा वडे, चपाती व भाजी. इ. उत्कृष्ट पाककृती मांडण्यात आल्या होत्या.
त्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम. अनिशा राणे,शिक्षणतज्ञ् सन्माननीय श्री.दिलीप भालेकर सर, माजी नगरसेविका सन्माननीय सौ. दिपाली भालेकर मॅडम, शिक्षिका सौं. सावंत मॅडम, मुख्याध्यापक सौं लांबर मॅडम तसेच पालकांमधून सौं. रेखा डंकी, समीक्षा खोचरे, गीता चव्हाण, साधना हेवाळे, कांचन दळवी, वर्षा साळुंखे, बिन्दू गौण्ड, रंजू देवी प्रसाद, अनिता राम, पूनम लाखे, सारिका लाखे,सुरेखा भिसे, सारिका भिसे, पूजा यादव,दीपा गावडे या सर्वानी अतिशय सुंदर प्रकारे पाककृती मध्ये सहभाग घेतला होता. सर्वांचे मनःपूर्वक आभार
