Headlines

विजयदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी आठ कोटी रुपये देणार…

प्ररणोत्सव समितीला पालकमंत्री चव्हाण यांचे आश्वासन. ⚡देवगड ता.२७-: विजयदुर्ग किल्ल्याच्या दर्या बुरुजासह, हनुमंत बुरुज, गणेश बुरुज आणि याशी संबंधित तटबंदी यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या अपेक्षित अंदाजपत्रकानुसार ८ कोटी रुपयांचा निधी पुरातत्व खात्यास देण्याचे ठोस हमी ना. रवींद्र चव्हाण यांनी प्रजासत्ताकदिनी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकार्याना दिली. २२ जानेवारीच्या श्री रामलल्लाच्या प्रतिस्थापनेच्यादिनी विजयदुर्गवासीयांनी दर्या…

Read More

मळेवाड शिरोडा ते शिरोडा आरवली बायपास रस्त्याच्या कामाला सुरुवात…

सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार मंदार नाईक यांनी दिली भेट.. सावंतवाडीमळेवाड शिरोडा तसेच शिरोडा आरवली बायपास रस्त्याचे काम अखेरीस सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले असून यां ठिकाणी प्रत्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार मंदार नाईक नंदू परब राजाराम उर्फ आबा चिपकर मनोज कांबळी प्रणित तळकर विशाल बर्डे यांनी भेट देत पाहणी केली. यां दोन्ही रस्त्या प्रश्न सावंतवाडी…

Read More

आमदार वैभव नाईक यांचा३५ हजार मतांनी पराभव निश्चित…

मुख्यमंत्री मदतकक्ष कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांचे वक्तव्य.. ⚡कुडाळ ता.२७-: कुडाळ-मालवण मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील महावितरणचे कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले यांच्या मृत्यूप्रकरणी फाले कुटुंबीयाला मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाख रुपयांची मदत मिळाल्याचे प्रसिद्ध केले होते. मात्र, याबाबत मुख्यमंत्री सहायता मदतकक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी आमदार वैभव नाईक…

Read More

वेंगुर्ला येथून आंबा पेट्या वाशी मार्केटला रवाना…

⚡वेंगुर्ला ता.२७-: लता गुड्स ट्रान्सपोर्टमधून वेंगुर्ला-वडखोल येथील आंबा बागायतदार शिवप्रसाद केरकर यांच्या बागेतील सहा डझनी आंबा पेट्या २६ जानेवारी रोजी वाशी मार्केट मध्ये रवाना झाल्या.

Read More

मिहिर कुलकर्णी याचे सीए परिक्षेत यश…

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला येथील ‘गुरूकृपा‘ कापड दुकानाचे मालक प्रदिप शिवराम कुलकर्णी यांचा मुलगा मिहिर प्रदिप कुलकर्णी याने पुणे येथे सी.ए.फायनल परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या यशात त्याला आई-वडिलांची मोलाची साथ लाभली. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

वेशभूषा स्पर्धेत अनन्या नंदगिरीकर व मनस्वी पालकर प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.२७-: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला येथील सरस्वती शिशुवाटीकेतील लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत अनन्या नंदगिरीकर व मनस्वी पालकर यांनी प्रथम, हर्ष देऊलकर याने द्वितीय तर नियान तेली याने तृतीय क्रमांक पटकाविला.

Read More

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या आश्वासनाअंती कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपोषण तुर्तास स्थगित…

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनस आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणुन रेल्वेमंत्री यांची फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात भेट घालून देतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या मध्यस्थीने दिले तसेच राजन तेली यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने तात्पुरते…

Read More

मळगाव येथील शारदा विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय मळगाव प्रशालेत भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर शाळेतील मुलांनी फुगा कवायत सादर केली. यावेळी शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, शाळा व्यवस्थापान समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, पालक…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनी” ध्वजारोहण व विविध स्पर्धा उत्साहात संपन्न …

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल व सेंट्रल उर्दू स्कूल मध्ये” दि. २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण सकाळी ठीक ७.२५ वाजता सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संस्थेचे विश्‍वस्थ श्री . रफिक शेख यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी प्रशालेत सुरेल देशभक्तीपर…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सबज्युनियर अॅथलेटिक काॅम्पिटीशनमध्ये स्टेपिंग स्टोनच्या विद्यार्थ्यांचा डंका…

⚡सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सबज्युनियर अॅथलेटिक काॅम्पिटीशनमध्ये स्टेपिंग स्टोनच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने सहभाग घेतला. या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांना ओरोस क्रिडा संकुल येथे नेण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ७४ विद्यार्थी सहभागी झाले. त्यापैकी, इयत्ता ८ वर्षाखालील विद्यार्थिनींपैकी ‘ लांब उडी ‘ स्पर्धेमध्ये इयत्ता १ ली तील ‘ कु. आनंदी धोंड ‘ प्रथम क्रमांकाने ,…

Read More
You cannot copy content of this page