⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल व सेंट्रल उर्दू स्कूल मध्ये” दि. २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण सकाळी ठीक ७.२५ वाजता सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संस्थेचे विश्वस्थ श्री . रफिक शेख यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी प्रशालेत सुरेल देशभक्तीपर गीत गायन केले. तसेच प्रशालेच्या मैदानावर विद्यार्थांनी संचलन केले.तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशालेत विविध क्रीडास्पर्धां , इनडोअर गेम व विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
या खेळामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच उपस्थित सर्वांनीच सहभाग घेत खेळाचा आनंद घेतला. . या कार्यक्रमांला सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष श्री . इम्तियाज खानापूरी, सचिव श्री .हिदायतुल्ला खान , सहसचिव श्री . सुलेमान बेग , विश्वस्थ श्री . परवेज बेग , श्री. मुश्ताक बागवान , श्रीम. अलिजा खान, श्री . खलील अब्दुल सलाम खान , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे सर्व पालक प्रतिनिधी ,सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी , पालकवर्ग , विद्यार्थी , विविध सामाजिक स्तरावरील व्यक्ती मोठ्या संख्येने शाळेत उपस्थित होते . या कार्यक्रमाला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
