⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय मळगाव प्रशालेत भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर शाळेतील मुलांनी फुगा कवायत सादर केली. यावेळी शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, शाळा व्यवस्थापान समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, सदस्य सिद्धेश तेंडोलकर, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, पालक मनोज मळगावकर, इतर पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. Ya कार्यक्रमानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
मळगाव येथील शारदा विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…
