Headlines

आचरा पोलीस स्टेशन निरीक्षक पदी सुरेश गावित…

⚡मालवण ता.२७-: आचरा पोलीस स्टेशनचा कार्यभार रत्नागिरी संगमेश्वर येथे सेवा बजावलेले सुरेश ठाकूर गावित यांनी शनिवारी स्विकारला. यामुळे आचरा पोलीस स्टेशनला निरिक्षक दर्जाचाअधिकारी मिळाला आहे.या अगोदर पोलीस निरीक्षक गावित यांनी रत्नागिरी जिल्ह्यात साडेचार वर्षे सेवा बजावली आहे. यात पुर्णगड पोलीस स्टेशन, पावस बाणकोट,संगमेश्वर या पोलीस ठाण्यांत सेवा बजावली आहे

Read More

सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून व्यापारी मेळावा यशस्वी करूया…

जिल्हा कार्यवाह नितीन वाळके मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरूरकर : मालवण व्यापारी संघ सदस्यांना ओळखपत्र वितरण.. ⚡मालवण ता.२७-: सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या आयोजनातून 36 वा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा एकता मेळावा मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे 31 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. या निमित्ताने 29 व 30 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read More

फरिदाबाद – हरियाना येथील इंडीया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलसाठी पांडुरंग काकतकर यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.२७-: विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, जैव तंत्रज्ञान विभाग, अवकाश संशोधन संस्था, पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने फरीदाबाद हरियाना येथील रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी (RCB) येथे आयोजित इंडीया इंटर नॅशनल सायन्स फेस्टिवल दि.17 ते 20 जानेवारी या कालावधीत संपन्न झाला.यामधील नॅशनल सायन्स टीचर्स वर्कशॉप यामध्ये विज्ञानाप्रती समर्पित अशा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी व…

Read More

शांत सुसंस्कृत शहराला गालबोट लागू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करा…

शांतता समितीच्या बैठकीत आवाहन:पोलिस निरीक्षक त्रषीकेश अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२७-: शहरात शांतता राखावी म्हणून सर्व समाजाच्या बांधवांनी सहकार्य करावे. समाजातील तणावामुळे शहराची बदनामी होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित राखून योग्य ती माहिती पोलिसांना द्यावी. आपल्या शांत सुसंस्कृत शहराला गालबोट लागू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन…

Read More

नरेंद्र मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान व्हावे…

आगणेवाडी भराडी देवी चरणी पालकमंत्री चव्हाण यांचे साकडे.. मालवण दि प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर जिल्ह्यात आमूलाग्र बदल झाला आहे. आमचा जिल्हा सर्वच बाबतीत चांगला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यवस्थेबद्दल सकारात्मक विचार ठेवा. व्होकल फॉर लोकलचा प्रचार आपणच करायचा आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून मोठा बदल शक्य आहे….

Read More

गटाराचे काम टप्प्याटप्प्याने करण्याचे सरपंच प्रियांका नाईक यांचे आश्वासन…

रियाज खान यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांनी उपोषण घेतले मागे.. बांदा/प्रतिनिधीबांदा वाफोली मार्गावर गवळीटेम्ब वाडीपर्यंत गटाराचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून येत्या आठ दिवसात याबाबतचे नियोजन करण्यासाठी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी दिल्याने रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी छेडलेले उपोषण सायंकाळी मागे घेतले.याठिकाणी गटाराचे काँक्रिटीकरण न केल्याने येथील नागरिकांना…

Read More

स्वराज्य प्रतिष्ठान बांद्याच्या वतीनेस्टॅचू स्पर्धेच आयोजन…

⚡बांदा ता.२७-: बांद्याच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या दिपावली शोटाईम मधुन सुरू झालेली व प्रेक्षकांच्या मनात घर करणारी तसेच स्थानिक व गोव्यातील कलाकारांना आकर्षित करणारी स्टॅचू स्पर्धा पुन्हा एकदा येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांनी आयोजित केली आहे. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग व गोवा राज्य मर्यादित या स्पर्धेचे आयोजन करण्यात…

Read More

मनोज जरांगे पाटील यांच्या लढाईला यश मिळाल्याने बांद्यात मराठा समाजाच्या वतीने जल्लोष…

⚡बांदा ता.२७-: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढाईला आज यश मिळाल्याने बांद्यात मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकजवळ फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला.यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब, सचिव आनंद वसकर, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, राजाराम उर्फ बाळु सावंत, म. गो. सावंत, पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक शिवराज…

Read More

इन्सुली कोठावळे बांध येथील ग्रामस्थांनी छेडले उपोषण…

गौण खनिज उत्खननाबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष करीत असल्याने केले आंदोलन:मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम सावंत यांनी मध्यस्थी करत काढला तोडगा.. सावंतवाडी ता.२७-: इन्सुली कोठावळे बांध येथील ग्रामस्थ गौण खनिज खाणींमुळे होत असलेल्या नुकसानी बाबत प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करुनही दखल घेत नसल्याने आज प्रांताधिकारी कार्यालया समोर उपोषण छेडले रात्रो पर्यंत उपोषणावर तोडगा न निघाल्याने सावंतवाडी सकल मराठा…

Read More

विजयदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी आठ कोटी रुपये देणार…

प्ररणोत्सव समितीला पालकमंत्री चव्हाण यांचे आश्वासन. ⚡देवगड ता.२७-: विजयदुर्ग किल्ल्याच्या दर्या बुरुजासह, हनुमंत बुरुज, गणेश बुरुज आणि याशी संबंधित तटबंदी यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या अपेक्षित अंदाजपत्रकानुसार ८ कोटी रुपयांचा निधी पुरातत्व खात्यास देण्याचे ठोस हमी ना. रवींद्र चव्हाण यांनी प्रजासत्ताकदिनी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकार्याना दिली. २२ जानेवारीच्या श्री रामलल्लाच्या प्रतिस्थापनेच्यादिनी विजयदुर्गवासीयांनी दर्या…

Read More
You cannot copy content of this page