⚡बांदा ता.२७-: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढाईला आज यश मिळाल्याने बांद्यात मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकजवळ फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला.
यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब, सचिव आनंद वसकर, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, राजाराम उर्फ बाळु सावंत, म. गो. सावंत, पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, महिला अध्यक्षा स्वाती सावंत, मिलिंद सावंत, मकरंद तोरसकर, दीपक सावंत, राकेश परब, ज्ञानेश्वर सावंत, अशोक परब, रत्नाकर आगलावे, निलेश सावंत, हेमंत मोर्ये, निलेश कदम, जय पटेकर, सागर गाड, अमोल गाड, जयवंतराव राणे-सरदेसाई, राजू देसाई, गणेश सावंत, दीपक पडवळ, लव रेडकर, माधवी गाड, अवंती पंडित, लक्ष्मी सावंत, सुरभी सावंत, राखी कळंगुटकर, ममता सावंत, रिया सावंत, स्मिता माजगावकर, दिक्षा सावंत, अदिती सावंत, सुचिता धुरी आदिसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी म. गो. सावंत, आनंद वसकर, निरीक्षक शामराव काळे, विराज परब, लक्ष्मी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या लढाईला यश मिळाल्याने बांद्यात मराठा समाजाच्या वतीने जल्लोष…
