⚡बांदा ता.२७-: बांद्याच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या दिपावली शोटाईम मधुन सुरू झालेली व प्रेक्षकांच्या मनात घर करणारी तसेच स्थानिक व गोव्यातील कलाकारांना आकर्षित करणारी स्टॅचू स्पर्धा पुन्हा एकदा येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांनी आयोजित केली आहे.
१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग व गोवा राज्य मर्यादित या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘शिवकालीन प्रतिमा’ हा विषय देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख ३००० रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय रोख २००० व सन्मानचिन्ह व तृतीय क्रमांकास रोख १००० व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर व स्पर्धा संयोजक अक्षय मयेकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी अक्षय मयेकर (मो. 9503871924) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठान कडून करण्यात आले आहे.
