Headlines

भुईबावडा येथील सिव्हिल इंजिनियर प्रकाश मोरे यांना पितृशोक…

⚡वैभववाडी ता.०५-: भुईबावडा पहिलीवाडी(सिमेवर) येथील सिताराम गणपत मोरे वय ९५ वर्षे यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. सिव्हिल इंजिनियर प्रकाश मोरे यांचे ते वडील होत. यापूर्वी सिताराम मोरे यांनी भुईबावडा गावची पाटीलकी म्हणून काम केले होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात्य तीन मुलगे, एक विवाहित मुलगी,…

Read More

स्नॅक सेंटर व आकांक्षी शौचालयाचे उद्घाटन…

⚡वेंगुर्ला ता.०५-: शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांच्या हस्ते कॅम्प-घोडेबांव उद्यान येथील स्नॅक सेंटर व बंदर येथील आकांक्षी शौचालयचे उद्घाटन करण्यात आले.

Read More

मठ स्वयंभू मंदिरात विविध कार्यक्रम…

⚡वेंगुर्ला ता.०५-: मठ येथील स्वयंभू मंदिरात ६ ते ९ मार्च या कालावधीत महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Read More

सागरेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम…

⚡वेंगुर्ला ता.०५-: उभादांडा येथील सागरेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त ७ मार्च रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, तर ८ मार्च रोजी शिवरात्री दिवशी विधीपूर्वक शिवपिडीचे पूजन, वरदशंकर पूजा, होमहवन, महाआरती, तीर्थप्रसाद, सायं. ४ वा. वारकरी भजने, त्यानंतर पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

वृत्तपत्र विक्रेते अरविंद धुरी यांचे निधन…

⚡मालवण ता.०५-: मालवण धुरीवाडा येथील रहिवासी आणि वृत्तपत्र विक्रेते अरविंद उर्फ अरु विठ्ठल धुरी (५९) यांचे सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मालवण शहरातील खांडाळेकर न्यूज पेपर एजन्सीच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे अरविंद धुरी हे मालवणात सायकलद्वारे फिरून वृत्तपत्र विक्री करत होते. हसतमुख आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा…

Read More

मिलिंद गांवकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित…

⚡सावंतवाडी ता.०५-: ओटवणे गावचे सुपुत्र तथा असरोंडी माध्यमिक विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक मिलिंद मधुसूदन गांवकर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कोल्हापूर येथील आविष्कार फाउंडेशनतर्फे शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांचाहस्ते मिलिंद गावकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मिलिंद गावकर असरोंडी माध्यमिक विद्यामंदिरमध्ये गेली…

Read More

अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे आम्हाला बळकटी मिळेल…

आम.नितेश राणे:विनायक राऊत यांचा 10 वर्षाचा लेखाजोखा कोरा असेल.. ⚡कणकवली ता.०५-: पंतप्रधान मोदी यांनी भारत देशाचा नागरिक आपला परिवार असल्याची भावना व्यक्त केली. त्यावर देशभर मोदींचा आम्ही परिवार आहोत अशी घोषणा,आणि स्टेटस ठेवले गेले. त्यामुळे संजय राऊत यांना मिर्ची लागली आहे.२०१४,२०१९ च्या प्रत्येक निवडणुकीत याच ठाकरे,राऊत यांनी मोदी परिवाराचा फायदा घेतला आणि मनात बेईमानी आल्यामुळे…

Read More

मळेवाड-कोंडुरे गावचे माजी पोलिस पाटील दशरथ मुळीक यांचे निधन…

⚡बांदा ता.०५-: मळेवाड-कोंडुरे गावचे माजी पोलिस पाटील दशरथ शंकर मुळीक(वय 80) यांचे मंगळवारी दि.5 मार्च रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. मुळीक यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान होते. आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळचे माजी सचिव म्हणून त्यांनी काही वर्षे कार्यकाळ सांभाळला. कोंडुरा येथे हायस्कूल सुरू करण्यास त्यांचा मोलाचा वाटा आहे. क्रीडा, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात त्यांनी…

Read More

कुडाळ महामार्गावर भीषण अपघातात सावंतवाडीतील एक ठार…

अन्या तिघे जखमी; पहाटे घडला अपघात.. ⚡कुडाळ ता.०५-: मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ शहरा लागून जाणाऱ्या ओव्हर ब्रिजवर आज पहाटे ५ च्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सावंतवाडीतील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून यामध्ये अन्य तिघे जखमी आहेत. जखमींना गोवा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, कार क्रमांक एम एच…

Read More

भाजपाच्या युवा मोर्चा सावंतवाडी अध्यक्षपदी संतोष राऊळ…

वेंगुर्ल्याची जबाबदारी प्रविण वायंगणकरांकडे.. सावंतवाडी,ता.०४: येथील भाजपाच्या युवा मोर्चा पदाधिकार्‍यांची निवड आज जाहीर करण्यात आली. यात आंबोली मंडल अध्यक्षपदी कोलगाव सरपंच संतोष राऊळ, तर वेंगुर्ला मंडल अध्यक्षपदी प्रणव वायंगणकर यांची निवड करण्यात आली आहे.

Read More
You cannot copy content of this page