भुईबावडा येथील सिव्हिल इंजिनियर प्रकाश मोरे यांना पितृशोक…

⚡वैभववाडी ता.०५-: भुईबावडा पहिलीवाडी(सिमेवर) येथील सिताराम गणपत मोरे वय ९५ वर्षे यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. सिव्हिल इंजिनियर प्रकाश मोरे यांचे ते वडील होत.

यापूर्वी सिताराम मोरे यांनी भुईबावडा गावची पाटीलकी म्हणून काम केले होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात्य तीन मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

You cannot copy content of this page