लाचखोर वनपाल राठोड यांना सशर्त जामीन…

ओरोस ता ५
नेरूर तर्फ हवेली वनपाल कार्यालयात १५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेलेले वनपाल अनिल हिरामन राठोड यांना जिल्हा विशेष न्यायाधीश सानिका जोशी यांनी २५ हजार रुपयांचा २५ हजार सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपी राठोड यांच्यावतीने ऍड संग्राम देसाई, ऍड यतीश खानोलकर, ऍड अविनाश परब, ऍड सुहास साटम यांनी काम पाहिले.


नेरूर तर्फ हवेली वनपाल अनिल राठोड यांनी लाकूड वाहतुकीस पास देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार घावनळे येथील लाकूड व्यावसायिक चंद्रकांत सखाराम मराठे यांनी जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार १ मार्च रोजी सापळा रचून नेरूर तर्फ हवेली वनपाल कार्यालय येथे वनपाल राठोड यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ३ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ३ मार्च मासून ते न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान, जिल्हा न्यायालयात त्यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होवून २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page