Headlines

वाघेरी ग्रामविकास मंडळातर्फे अक्षता कांबळी यांचा सन्मान…

⚡कणकवली ता.१२-: कला व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेत्री अक्षता कांबळी वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईतर्फे सन्मानित केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक राणे, खजिनदार सूर्यकांत गुरव, सुधाकर राणे, माजी सरपंच संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळातर्फे कांबळी यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी अशोक राणे, सूर्यकांत गुरव, सुधाकर राणे, अक्षता कांबळी यांनी…

Read More

करुळमध्ये मराठे कृषी कॉलेजचे एनएसएस शिबीर…

⚡कणकवली ता.१२-: करुळ गावामध्ये राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने विशेष श्रमसंस्कार शिबीर पार पडले.चार दिवसीय शिबिरात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, शाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद, शिवार फेरी, आधुनिक पद्धतीने भात लागवड तंत्रज्ञान, पटनाट्य, प्रगतशील शेतकरी भेट, गटचर्चा, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन, बंधारा बांधणे हे कार्यक्रम झाले. एनएसएस सेवा योजनेंतर्गत राबविलेल्या उपक्रमांविषयी…

Read More

पाडलोस रवळनाथ मंदिराच्या छप्पर दुरुस्ती कामास विनामोबदला काम करणाऱ्यांचा सन्मान…

⚡बांदा ता.१२-:पाडलोस श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील अनेकांचे योगदान, दातृत्व लाभले आहे. जवळपास 55 वर्षांनी छप्पराची दुरुस्ती करण्यात आली आहे. देवस्थानच्या उद्धारासाठी सर्वांचे सहकार्य महत्वपूर्ण असल्याचे मानकरी आनंद गावडे, नंदा गावडे यांनी सांगितले. पाडलोस श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनच्या वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी मंदिराच्या छप्पर दुरुस्ती कामास विनामोबदला काम…

Read More

पाडलोस, दांडेलीत विजेचा लपंडाव…

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल : महेश कुबल यांचा आरोप.. ⚡बांदा ता.१२-:पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व विभागांनी सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाला दिले होते. परंतु महावितरण विभाग यापासून अलिप्त राहिला असल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले. शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे पाडलोस, दांडेली भागात विजेचा खेळ खंडोबा झाला. वाढत्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांना शनिवारी पूर्ण रात्र विजेविना…

Read More

आंबोलीत श्री देवी सती महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार उत्साहात

आंबोली,ता.,जकातवाडी येथील देवी सती महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धाराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.काल पासून विविध धार्मिक कार्यक्रम विधी करण्यात आले.आज मूर्ती प्रतिष्ठापना,होमहवन करण्यात आला.सर्व धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद कार्यक्रम झाला. येथील लिंगेश्वर मंदिरात देखील सत्यनारायन महापूजा कार्यक्रम झाला.

Read More

कासार्डेत 14 मे रोजी संयुक्त जयंती महोत्सव…

⚡कणकवली ता.१२-: बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डे – कदमवाडी यांच्यावतीने तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव मंगळवार 14 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सकाळी 10 वा. धम्मध्वज वंदन, 10.15 वा. बुद्ध पूजापाठ, दु.12.30 वा. भोजन, सायं….

Read More

गौरी बांदेकर रिल्स ग्रुप राज्यात प्रथम…

⚡बांदा ता.१२-: कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आयोजित चला मराठी बोलूया या विषयावरील राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेमध्ये बांदा येथील गौरी बांदेकर रिल्स ग्रुपने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. या रील्स मध्ये गौरी बांदेकर, अवंती पंडित, भारती परब, गजेंद्र कोठावळे, अंकिता पवार यांनी अभिनय साकारला आहे. यामध्ये दिग्दर्शन, संकल्पना, संवाद,…

Read More

बांद्यात टेम्पो ट्रॅव्हल व आयशर टेम्पो मध्ये अपघात…

टेम्पो ट्रॅव्हल मधील 9 प्रवासी जखमी:जखमींना बांदा प्राथमिक केंद्रात दाखल.. ⚡बांदा ता.११-: मुंबई गोवा महामार्गावरील बांदा स्मशानभूमी समोर वाहतूक कोंडीत अडकलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सला डंपरने मागून धडक दिल्याने टेम्पो ट्रॅव्हल समोर उभे असलेल्या आयशर टेम्पोला धडकली. यात टेम्पो ट्रॅव्हल मधील 9 प्रवासी जखमी झाले. प्रचंड पाऊस असल्याने अपघातानंतर तब्बल अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रवाशी गाडीतच होते….

Read More

पेंडूर येथे देवळी समाज दशावतार कलाकार सत्कार सोहळा २५ रोजी…

⚡मालवण ता.११-: देवळी समाज उन्नती मंडळ पेंडूर देऊळवाडी आणि देवळी समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी समाज दशावतार कलाकार सत्कार सोहळा दि. २५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता पेंडूर देऊळवाडी येथील श्री देवी सातेरी परिसर युवक संघटना रंगमंच (प्राथमिक शाळा पेंडूर क्र. १ नजीक) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून…

Read More

चौके येथे खासगी लक्झरी बसेसमुळे होतेय वाहतूक कोंडी…

⚡मालवण ता.११-:एप्रिल, मे या कालावधीत चौके येथील मुख्य नाक्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नाक्यावर वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे चौके सरपंच गोपाळ चौकेकर, उपसरंपच पी. के. चौकेकर यांनी मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेऊन केली. चौके येथील मुख्य नाक्यावर मालवण, कसाल, कुडाळ येथून मुंबईकर पर्यटक मोठ्या संख्येने येतात….

Read More
You cannot copy content of this page