टेम्पो ट्रॅव्हल मधील 9 प्रवासी जखमी:जखमींना बांदा प्राथमिक केंद्रात दाखल..
⚡बांदा ता.११-: मुंबई गोवा महामार्गावरील बांदा स्मशानभूमी समोर वाहतूक कोंडीत अडकलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सला डंपरने मागून धडक दिल्याने टेम्पो ट्रॅव्हल समोर उभे असलेल्या आयशर टेम्पोला धडकली. यात टेम्पो ट्रॅव्हल मधील 9 प्रवासी जखमी झाले. प्रचंड पाऊस असल्याने अपघातानंतर तब्बल अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रवाशी गाडीतच होते. मात्र स्थानिकानी स्वतःच्या वाहनाने सर्व जखमींना बांदा प्राथमिक केंद्रात दाखल केले.
रत्नागिरी वरवडे येथील पिरणकर व आढाव परिवार देव दर्शनासाठी गोवा येथे एम एच 08 बीसी 5099 या टेम्पो ट्रॅव्हल्सने गेले होते. देव दर्शन आटोपून परत माघारी रत्नागिरी येथे परतत असताना बांदा स्मशानभूमी येथे महामार्गावर वाहतूक कोंडी असल्याने टेम्पो ट्रॅव्हल चालकाने गाडी थांबविली दरम्यान त्याच दरम्यान गोव्यातुन कुडाळच्या दिशेने जाणारा एमएच 07 एजे 5337 आला असता पाऊस असल्याने डंपर वरील चालकाचे नियंत्रण सुटले व डंपरने ट्रॅव्हल्सला धडक दिली ही धडक एवढी मोठी होती की ट्रॅव्हल्स समोर उभे असलेल्या आयशर टेम्पोला धडकली. दरम्यान डंपर चालकाने प्रसंगावधान राखुन डंपर दुभाजकावर घातल्याने ट्रॅव्हल्सची मोठी हानी झाली नाही मात्र मागच्या भागाचे व दर्शनी भागाचे नुकसान झाले.
या अपघातात सिद्धीका प्रजय आढाव 15 , पलक प्रशांत आढाव वय 14, प्रतिभा प्रकाश आढाव, स्वरा महेश पिळणकर 14, समृद्धी प्रजय आढाव वय 18, तेजल महेश पिरणकर वय 23, हर्षदा महेश पिरणकर, प्रकाश लक्ष्मण आढाव,
महेश मारुती आढाव वय 35 याना दुखापत झाली.
