वाघेरी ग्रामविकास मंडळातर्फे अक्षता कांबळी यांचा सन्मान…

⚡कणकवली ता.१२-: कला व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेत्री अक्षता कांबळी वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईतर्फे सन्मानित केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक राणे, खजिनदार सूर्यकांत गुरव, सुधाकर राणे, माजी सरपंच संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळातर्फे कांबळी यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी अशोक राणे, सूर्यकांत गुरव, सुधाकर राणे, अक्षता कांबळी यांनी मनोगत व्यक्त केले.

You cannot copy content of this page