करुळमध्ये मराठे कृषी कॉलेजचे एनएसएस शिबीर…

⚡कणकवली ता.१२-: करुळ गावामध्ये राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने विशेष श्रमसंस्कार शिबीर पार पडले.
चार दिवसीय शिबिरात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, शाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद, शिवार फेरी, आधुनिक पद्धतीने भात लागवड तंत्रज्ञान, पटनाट्य, प्रगतशील शेतकरी भेट, गटचर्चा, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन, बंधारा बांधणे हे कार्यक्रम झाले. एनएसएस सेवा योजनेंतर्गत राबविलेल्या उपक्रमांविषयी कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण भोकरे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमांना सरपंच समृद्धी नगर, ग्रा. प. सदस्य व संस्थेचे पदाधिकारी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. कदम, प्राध्यापकांनी उपस्थिती दर्शवली होती. या शिबिरात स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.

You cannot copy content of this page