कासार्डेत 14 मे रोजी संयुक्त जयंती महोत्सव…

⚡कणकवली ता.१२-: बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डे – कदमवाडी यांच्यावतीने तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव मंगळवार 14 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे.


या दिवशी सकाळी 10 वा. धम्मध्वज वंदन, 10.15 वा. बुद्ध पूजापाठ, दु.12.30 वा. भोजन, सायं. 4.30 वा. मिरवणूक, 7.30 वा. जाहीर सत्कार समारंभ असून सभाध्यक्ष विजय कदम, तर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, कासार्डे विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय भोसले, शिक्षक दत्तात्रय मारकड, सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, माजी सरपंच तथा उद्योगपती संतोष पारकर, ग्रा. पं. सदस्या श्रद्धा शेलार आदी उपस्थित राहणार आहेत.
रात्री 10 वा. कलांकूर मालवण निर्मित ‘मराठी आस्मतेच्या पाऊलखुणा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डेच्यावतीने अध्यक्ष विजय कदम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page