Headlines

सुरक्षा रक्षक निवडीत दलालांकरवी कोण खातंय ‘मलई’ ?

कडक कारवाई करा: अन्यथा १५ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन:प्रसाद गावडे यांचा इशारा.. ⚡कुडाळ ता.०३- : सुरक्षा रक्षक नियुक्त्यांमागे सुरक्षा रक्षक संघटनेतील दलालांकरवी “मलई” लाटली जाते हे ठळकपणे अधोरेखित..होत आहे. त्यामुळे पैसे घेऊन नियुक्त्या देण्याऱ्या रॅकेट वर कठोर कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी केली आहे. कारवाई झाली…

Read More

नावळे गावातील धोकादायक ११ विद्युत पोल बदला…

ग्रामस्थांनी केली वीज वितरण कंपनीकडे मागणी.. वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यातील नावळे गावातील 11 लोखंडी पोल धोकादायक बधले आहेत सदरचे पोल तात्काळ बदलून मिळावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून वीज वितरण कंपनीकडे केली आहे. नावडे गावातील एकूण चार वाड्यामध्ये 11 लोखंडी पोल चडल्याने धोकादायक बनले आहेत सदरचे पोल हे सन1972 मध्ये जेव्हा लाईट गावात तेव्हा टाकलेल्य आहेत त्यापासून आज…

Read More

जगन जंगले यांना समाज बांधवांनी केली ५० हजाराची मदत…

समाजाच्या विचार मंचाच्यावतीने मदतीचे करण्यात आले होते आवाहन.. वैभववाडी प्रतिनिधीधनगर समाज विचार मंच सिंधुदुर्गाच्या वतीने मदतीसाठी आवाहन केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजातील अधिकारी कर्मचारी व समाज बांधवांनी जगन जंगले यांना पुढील उपचारासाठी 50 हजाराची आर्थिक मदत दिली .काही दिवसापूर्वी दादर ते कल्याण प्रवास करत असताना ठाणे रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे अपघातात होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण…

Read More

बेपत्ता यशवंत गवस यांचा मृतदेह मडूरा साईमंदिर नजिक मिळाला…

बांदा/प्रतिनिधीमडूरा – भरडवाडी येथील साईमंदिर नजीक यशवंत लाडू गवस (रा. पिकुळे, ता. दोडामार्ग) यांचा मृतदेह आढळून आला. ते कालपासून बेपत्ता होते. ते २९ मे रोजी पत्नी व मुलीसह निगुडे येथे पाहुण्यांकडे आले होते. रविवार २ जून रोजी सकाळी ७.३० च्या दरम्यान ते मडूरा तिठा येथे पेपर नेण्यासाठी आले होते. मात्र, ते वाट चुकले व भरडवाडी…

Read More

फुकेरी धरण बांधताना आक्षेप घेण्यास 10 जून पर्यंत मुदत…

भूसंपादन न करताच काम आले करण्यात:साईप्रसाद कल्याणकर यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष.. बांदा/प्रतिनिधीदोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील धरणाच्या कामाला चार वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. काम सुरू झाल्यानंतर धरणाचे ७५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. धरणाचे काम निम्म्यापेक्षा अधिक झाले असताना चार वर्षांनंतर उपजिल्हाधिकारी, भूसंपादन यांनी जमीन मालकांना २ मे रोजी भूसंपादनाच्या नोटिसा बजाविल्या आहेत. जमीन मालकांनी…

Read More

६ जून रोजी छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर महानाट्य…

१२० स्थानिक कलाकारांचा सहभाग:निर्माते भाऊ सामंत यांची माहिती.. ⚡मालवण ता.०२-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या मालवणनगरीतील शिवप्रेमी मित्रमंडळाने छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० वर्षांच्या सांगता दिनाच्या निमित्ताने एका शिवरायांच्या चरित्रावर आधारित सह्याद्रीचा सिंह… राजा शिवछत्रपती या महानाट्याची निर्मिती केली असून तब्बल १२० स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेले हे महानाट्य दि. ६ जून रोजी रात्री ८.३० वाजता मालवण…

Read More

..अन्यथा तुमचे पितळ उघडे पाडू

आमदार नीतेश राणे यांचा इशारा… ⚡कणकवली ता.०३-: उद्धव ठाकरे, संजय राऊत हे लंडनमध्ये बसून भाजपासोबत, एनडीएमध्ये येण्यासाठी मीटिंग घेत वाटाघाटी करतात आणि भारतात येऊन मोदींवर टीका करतात. हा दुटप्पीपणा त्यांनी बंद करावा. नाहीतर लंडनमधील बैठकीचे सगळे फोटो, व्हिडीओ जाहीर करू, असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नीतेश यांनी दिला. तर सांगली लोकसभा मतदारसंघाचे निमित्त सांगून उद्धव…

Read More

रश्मी मोरजकर यांचे निधन…

⚡कणकवली ता.०३-: नांदगाव येथील रहिवासी रश्मी राजेंद्र मोरजकर यांचे मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगे, सूना, काका, काकी, भावजय, पुणते, पुतणी असा मोठा परिवार आहे. नांदगाव व्यापारी संघटनेचे सभासद रामचंद्र मोजरकर यांच्या पत्नी तर पत्रकार ऋषिकेश मोरजकर यांच्या काकी होत.

Read More

बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविणाऱ्या मुलांचा शिंदे शिवसेना- युवासेनेतर्फे सत्कार…

⚡मालवण ता.०३-:काही दिवसांपूर्वी मालवण बंदर जेटी येथील समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविणाऱ्या वरद सापळे, रूद्र गांवकर, अंगद गांवकर, हर्ष कुबल या पोहण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांचा व त्यांचे प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे यांचा शिवसेना शिंदे गट युवासेनेतर्फे सत्कार करण्यात आला. मुलांच्या या धाडसी कार्याचे व त्यामागे मेहनत घेणाऱ्या गवंडे यांच्या कार्याचे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. शिवसेना (शिंदे…

Read More

लोकसभा निकालासाठी भाजपा कार्यकर्ते रत्नागिरीला रवाना…

⚡सावंतवाडी ता.०३-: रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभा निकालासाठी भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडीतील कार्यकर्ते रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले आहेत. श्री देव पाटेकर व श्री.देव उपरलकर चरण आशीर्वाद घेत महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. याप्रसंगी भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले,भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, भाजप नेते महेश सारंग,…

Read More
You cannot copy content of this page