जगन जंगले यांना समाज बांधवांनी केली ५० हजाराची मदत…

समाजाच्या विचार मंचाच्यावतीने मदतीचे करण्यात आले होते आवाहन..

वैभववाडी प्रतिनिधी
धनगर समाज विचार मंच सिंधुदुर्गाच्या वतीने मदतीसाठी आवाहन केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजातील अधिकारी कर्मचारी व समाज बांधवांनी जगन जंगले यांना पुढील उपचारासाठी 50 हजाराची आर्थिक मदत दिली .
काही दिवसापूर्वी दादर ते कल्याण प्रवास करत असताना ठाणे रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे अपघातात होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील येथील युवक जगन जंगले गंभीर जखमी होऊन दोन्ही पाय त्यांनी गमावले होते. पुढील उपचारासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती यासाठी धनगर समाज सिंधुदुर्ग जिल्हा विचार मंचाच्या वतीने आर्थिक मदतीसाठी आवाहन केले नंतर आव्हानाला प्रतिसाद देऊन समाज बांधव अधिकाऱ्यांनी तात्काळ विचार मंचाचे सचिव एकनाथ जानकर यांच्याकडे मदत जमा करून ती जगन जंगले यांना देण्यात आली.

You cannot copy content of this page