हरित लवादाचा आदेश मोडल्याप्रकरणी नऊ जणांना कारणे दाखवा नोटीस…
⚡बांदा ता.२५-: बांदा सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या परिसरात राष्ट्रीय हरित लवादाने आदेश देऊनही ४४ हजार पैकी केवळ १६ हजार झाडांचीच लागवड करण्यात आल्याने आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी हरित लवादाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह इतर नऊ जणांना कारणे दाखवा नोटीसा बजाविल्या आहेत. याप्रकरणी १२ जुलै रोजी सुनावणी घेऊन संबंधित विभागाला म्हणणे सादर करण्याचा आदेश हरित लवादाने दिला…
