८५ पैकी ६७ नवीन शिक्षकांचा शिक्षक भारतीय प्रवेश…

मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यात नवनियुक्त ८५ कार्यरत शिक्षकांपैकी ६७ शिक्षकांनी शिक्षक भारती संघटना मालवण शाखेत जाहीर प्रवेश केला आहे.

कट्टा येथील मामा माडये हॉल येथे
महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा मालवण यांच्या वतीने शिक्षक सन्मान व जाहिर मेळावा शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक किसन दुखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी व्यासपीठावर शिक्षक भारती लढ्यातील अग्रणी राधिका जगदाळे, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, तालुकाध्यक्ष दिनकर शिरवलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच भाग्यश्री भोसले, राजश्री बदरखे, सर्जेराव घुटे, अस्मा तांबोळी, श्याम ताठे ,राज्य संघटक किसन दुखडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्या नेहा गवाणकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सातवसे , मंगेश बागवे शिक्षक नेते संतोष परब ,संतोष कोचरेकर, धानजी चव्हाण, महिला आघाडी अध्यक्ष शितल परुळेकर, सचिव सेजल परब, उपाध्यक्षा स्मिता गावडे, कुडाळ तालुका अध्यक्ष विनेश जाधव, मालवण तालुक्यातील पदाधिकारी व शिक्षक भारती संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी प्रास्ताविक कृष्णा कालकुंद्रीकर यांनी केले कार्यक्रम दरम्यान किसन दुखंडे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील १५ गरजू विद्यार्थ्यांना १५ हजार रु. चे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच शिक्षक भारती सभासद यशस्वी पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी केले.

फोटो :

शिक्षक भारती मालवण शाखेत ६७ नवनियुक्त शिक्षकांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व शिक्षक.

You cannot copy content of this page