मुलांने वडिलांवर केले सूऱ्याने वार: वडील गंभीर जखमी; मुलाला अटक..
⚡देवगड ता.२४-:
कुत्र्याच्या खाण्यासाठी कोंबडीचे पाय आणण्याच्या कारणावरून घरात वाद घालून वडिलांवरच मासे कापण्याच्या सूऱ्याने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी जामसंडे सहकारनगर येथील करण रविकांत पारकर व ३१ या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे ही घटना २३ जून रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास जामसंडे सहकार नगर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामसंडे सहकार नगर येथे राहत असलेल्या रविकांत रघुनाथ पारकर ६४ यांच्या लहान मुलगा करण पारकर यांनी कुत्र्यांना खाण्यासाठी कोंबडीचे पाय आणायचे आहेत ते घेऊन ये असे मोठा भाऊ सिद्धार्थ याला सांगितले. परंतु त्यांने ते संध्याकाळी घेऊन येतो असे सांगितल्यावर त्याचा राग येऊन करण याने घरातील सर्वांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. व वडील रविकांत पारकर यांना हाताच्या थापटाने मारून नंतर घरातील मासे कापण्याचा सुरा घेऊन त्याने डाव्या हातावर व पाठीवर वार करून मोठी जखम केली. या प्रकरणी रविकांत पारकर यांनी देवगड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी करण पारकर याचे विरुद्ध भादवी कलम ३२४,३२६,३२३,५०४ अन्वये गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ७ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत.
