Headlines

असलदे डामरेवाडी येथील धोकादायक वळणावर जेसीबीने रुंदीकरण…

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी घेतली दखल:असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या मागणीला यश.. कणकवली : देवगड निपाणी महामार्गावरील असलदे डामरेवाडी प्रवासी शेड येथील धोकादायक वळणावर छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले होते. काही महिन्यांपूर्वी खाजगी बस व कारमध्ये अपघात झाला होता. त्यामुळे हे धोकादायक वळण कमी करण्यात यावे , वाढलेली झाडे सार्वजनिक बांधकाम…

Read More

मत्स्य विभाग अजून किती मच्छीमारांचा बळी जाण्याची वाट पाहणार.. ?

मच्छीमार नेते रश्मीन रोगे यांचा संतप्त सवाल.. मालवण (प्रतिनिधी) निवती समुद्रात मच्छीमारी करून परत येत असताना नौका पलटी होऊन दोन मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचे मच्छीमार म्हणून आम्हाला दुःखच आहे. परंतु मत्स्य विभागाने अनधिकृत मासेमारीकडे डोळेझाक केल्यामुळे अशा घटना घडत असून अजून किती मच्छीमारांचा बळी जाण्याची वाट मत्स्य विभाग पाहणार…

Read More

शिरगांव येथिल पुं.अं. कर्ले महाविद्यालयातपोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रास मंजूरी…

“करिअर कट्टा” उपकम : देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी.. देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील शिरगांव पेथिल पुंडलिक अंबाजी कर्ले कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शासनाच्या महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र संचलीत “करीअर कट्टा” या उपक्रमाअंतर्गत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रास मंजूरी देण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांना करिअर करण्याची…

Read More

पर्यटन व्यावसायिक महासंघाची भूमिका हास्यास्पद…

अन्वय प्रभू:पर्यटन महासंघ भाजपची बी टीम असल्याचीही केली टीका.. मालवण : (प्रतिनिधी) राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी कोसळला, त्यावेळी पर्यटन महासंघाने आपली याबाबतची भूमिका तटस्थपणे स्पष्ट करणे आवश्यक होते. परंतु भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या या पुतळ्याच्या कामाचे भाजपने श्रेय घेतले असल्याकारणाने पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मौन राहणे पसंत केले. त्यामुळे राजकोट किल्ल्यावरील…

Read More

कॅन्सरग्रस्त रुग्णाला आम. वैभव नाईक यांच्याकडून मदत…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील नांदोस येथील कॅन्सरची शस्त्रक्रिया झालेल्या रावजी चव्हाण यांना औषधोपचारासाठी आमदार वैभव नाईक यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. रावजी चव्हाण यांच्यावर काही दिवसांपूर्वीच कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती. आमदार वैभव नाईक यांना याची माहिती मिळताच रावजी चव्हाण कुटुंबीयाशी संपर्क साधत त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. यावेळी चव्हाण कुटुंबीयांनी आमदार नाईक यांचे…

Read More

भोसले फार्मसी कॉलेजचा महादेव धुरी मुंबई विद्यापीठ कथालेखन स्पर्धेत तृतीय…!

⚡सावंतवाडी ता.०५-: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमधील बी.फार्मसी तृतीय वर्षात शिकणाऱ्या महादेव धुरी याने मुंबई विद्यापीठाच्या कथालेखन अंतिम फेरीत तृतीय क्रमांक पटकावला. मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ.निलेश सावे आणि प्राचार्य, सोनोपंत दांडेकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स व सायन्स यांच्या हस्ते कांस्य पदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्याला गौरविण्यात आले. महादेव याने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे…

Read More

सिंधुदुर्गातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष…

कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष समितीने खासदार अमोल कोल्हेंचे लक्ष वेधले… सावंतवाडी – ५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या १० रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा तिकीट कोटा सह प्रवाशाच्या सोयीसुविधा पुरविण्या बाबत जाणीवपूर्वक मेढरासारखा प्रवास समस्या बाबत अन्याय होतअसून जलद गाड्या थांबे , तिकीट कोठा , रस्ते आणि स्टेशन प्लॅटफॉर्म वविविध समस्यांबाबत केंद्र सरकार च्या रेल्वेचे स्थायी समिती सभेत…

Read More

आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थ आहेत – आ. नितेश राणे…

कणकवली : गांधी घराण्याचे वारस, काँग्रेस ननेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या विधानानंतर त्याची दखल देशात घेणे गरजेचे आहे. काँग्रेसने कायमच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय केला आहे. पंतप्रधान मोदी आरक्षणाचे संरक्षण करायला समर्थ आहेत. आरक्षणविरोधी बोलणाऱ्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जे नेते उद्या प्रचाराला येतील त्यांना राहुल गांधींच्या आरक्षण संपवण्याच्या विधाना जाब…

Read More

आयुर्वेदिक महाविद्यालयात “त्वचाविकार बाह्य रुग्ण विभाग सुरू…

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात“त्वचाविकार बाह्य रुग्ण विभाग’ कार्यान्वित करण्यात आला असून या विभागाचे लोकार्पण बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलचे डॉ महेश सावळगीमठ यांच्याहस्ते करण्यात आले. समाजसेवेच्या माध्यमातून आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण योगदान देत असलेले प्रसिद्ध डॉ प्रविणकुमार ठाकरे हे या त्वचाविकार बाह्य रुग्ण विभागात त्वचा रुग्णांची तपासणी करून चिकित्सा करणार आहेत.भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाने…

Read More

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत चिताराळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथम…!

सावंतवाडी: पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चिताराळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सावंतवाडी प्रथम क्रमांकाच मानकरी ठरले आहे. ९ ऑक्टोबरला मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते चिताराळी मंडळाला गौरविण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ…

Read More
You cannot copy content of this page