कॅन्सरग्रस्त रुग्णाला आम. वैभव नाईक यांच्याकडून मदत…!

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील नांदोस येथील कॅन्सरची शस्त्रक्रिया झालेल्या रावजी चव्हाण यांना औषधोपचारासाठी आमदार वैभव नाईक यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

रावजी चव्हाण यांच्यावर काही दिवसांपूर्वीच कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती. आमदार वैभव नाईक यांना याची माहिती मिळताच रावजी चव्हाण कुटुंबीयाशी संपर्क साधत त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. यावेळी चव्हाण कुटुंबीयांनी आमदार नाईक यांचे आभार मानले. नांदोसचे माजी सरपंच अशोक नांदोसकर यांनी देखील चव्हाण यांना आर्थिक मदत दिली. यावेळी अशोक नांदोसकर, प्रभाग अध्यक्ष विजय गावडे, माजी सदस्य दिलीप हंजनकर, ऍड. हृदयनाथ चव्हाण, शंकर चव्हाण, विजया नांदोसकर यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page