फ्लाय९१ आणि सिंधुदुर्ग विमानतळाच्या नि:शुल्क कोच सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡कुडाळ ता.२८-; फ्लाय९१ आणि सिंधुदुर्ग विमानतळ प्रशासनाने संयुक्तपणे सुरू केलेली चिपी विमानतळ ते पणजी (गोवा) दरम्यानची नि:शुल्क कोच सेवा प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा ठरत आहे. या सेवेमुळे चिपी विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना गोव्याच्या मुख्य शहरापर्यंत पोहोचण्यासाठी आता सहज, सोयीस्कर आणि खर्चिक त्रासाशिवाय प्रवास करता येतो.आरामदायी वातानुकूलित बस, ठराविक वेळापत्रक, आणि प्रवाशांच्या गरजांचा विचार करून आखलेला मार्ग…
