⚡बांदा ता.२८-: बांदा १ सेक्शन ऑफिस अंतर्गत येणाऱ्या वाफोली या गावात काम करत असलेला विज कंत्राटी कामगार श्री. प्रतिक दळवी ( रा. विलवडे ) यांचा दि. २४.०६.२०२५ रोजी वाफोली या ठिकाणी वीज पोलवरुन पडुन अपघाती जखमी झाला त्याला सावंतवाडी मधील डॉ. खटावकर याच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.
यावेळी त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला गंभीर दुखापत झाली होती.
वीज पोलवरुन पडून जखमी कंत्राटी कामगार प्रतीक दळवी यांना वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग यांच्या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक मदत सुपुत केली.
कामगारांनी यावेळी सावंतवाडी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस करून त्याला धीर दिला.
यावेळी विज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग संस्थापक अध्यक्ष संदीप बांदेकर सरचिटणीस योगराज यादव कोषाध्यक्ष बापू देसाई प्रकाश धुरी, अमोल वाडकर, दत्तप्रसाद कांदे, धनंजय मांजरेकर रितिक खोरागडे राजेश वेंगुर्लेकर,कायम
कर्मचारी अमित वाघाटे, नरेश मोतीपल्ले, कंत्राटी कामगार गणेश देसाई, भूषण कदम, राजगुरू, मंदार गोसावी, अजित पालेकर गंगाराम सावंत आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जखमी कामगार यांना आर्थिक मदत करतेवेळी वाफोली सरपंच उमेश शिरोडकर उपस्थित होते.
पावसाळ्यात विजेचे काम करत असताना वीज तांत्रिक कामगारांनी सुरक्षितेचे साधने याचा वापर करावा, आपल्या जीवाची काळजी घ्यायची असे आवाहन वीज संघटनेच्या वतीने बांदेकर यांनी केले .