⚡आंबोली ता.२८-: येथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) यांचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही मोहीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यशस्वी झाली. त्याचा मृतदेह दरीत दीडशे फुट खोलवर आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला.
कावळेसाद दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला….*
