Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर…!

⚡ओरोस ता.१८-: सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफार्मरची मागणी केली होती त्यानुसार सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पहिल्या टप्यात कुडाळ तालुक्यातील तीन तर…

Read More

जत येथील बालिकेवरील अत्याचाऱ्याना फाशी द्या…

महिला अत्याचार संघर्ष समितीची मागणी.. सिंधुदुर्गनगरी ता १८सांगली जिल्ह्यातील जत करजगी या गावात चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करणाऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा महिला अत्याचार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सांगली जिल्ह्यातील जत करजगी या गावात काही दिवसापूर्वी चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण…

Read More

भोसले इन्स्टिटयूटचे ‘मेट्रोपल्स आणि रेक्स २०२५’ मध्ये उल्लेखनीय यश…

⚡सावंतवाडी ता.१८-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील विद्यार्थ्यांनी मेट्रोपॉलिटन इन्स्टिटयूट, सुकळवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेट्रोपल्स आणि रेक्स २०२५’ या नॅशनल टेक्निकल इव्हेंटमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले._ कॉलेजच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी ६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. टेक्निकल पेपर प्रेझेंटेशनमध्ये सुयोग देसाई व संतोष शर्मा यांनी…

Read More

सिंधुदुर्गनगरीत लवकरच सुरू होणार ‘पालकमंत्री कक्ष’…

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल.. कणकवली दि.१८ : सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांची भेट घेता यावी, त्यांचे जिल्हा प्रशासनासंदर्भातील प्रश्न, समस्या त्याच ठिकाणी मार्गी लावाव्यात या अनुषंगाने पालकमंत्री नीतेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच लवकरच ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे.या ठिकाणी पालकमंत्री स्वतः जनतेचे प्रश्न, समस्या मार्गी…

Read More

संजय पडते यांचा उबाठा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा…

आंगणेवाडी यात्रेनंतर ठरविणार पुढची भूमिका:उबाठातील अंतर्गत घडामोडीना कंटाळून राजीनामा.. कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. आज कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय पडते यांनी याची घोषणा केली. सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चाललेल्या घडामोडी पाहता काम करणं अशक्य असल्यानं राजीनामा देत असल्याचं पडते…

Read More

श्री संत गाडगेबाबा यांच्या नावाने संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवा…

दिलीप भालेकर यांची मागणी: पालिका प्रशासनाकडे निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.१८-: स्वच्छतेचे महान पुजारी समाज सुधारक श्री संत गाडगेबाबा यांच्या नावाने संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर व पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे केली. श्री संत गाडगेबाबा महाराज परिट समाज सिंधुदुर्ग जिल्हा व सावंतवाडी तालुका सेवा संघ यांच्या…

Read More

सांगुळवाडी ग्रामस्थ आयोजित शिव महोत्सव निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

⚡वैभववाडी ता.१८-: सांगुळवाडी ग्रामस्थ आयोजित शिव महोत्सव सांगळवाडी त्या महोत्सवाचे हे सातवे वर्ष असून सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिव महोत्सव सांगळवाडी 2025 निमित्त सामाजिक बांधिलकी जपत 18 फेब्रुवारी 2025 रोजी महा रक्तदान शिबिर तर 19 फेब्रुवारी 2025 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी तालुक्यातील शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आव्हान सांगुळवाडी ग्रामसच्या वतीने करण्यात…

Read More

गवा रेड्याच्या ठोकरने मृत्यू झालेल्या व्यक्तीस आर्थिक मदत द्या…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वनविभागाकडे मागणी. ⚡सावंतवाडी ता.१८-: २६ जानेवारी रोजी सकाळी कुडाळ येथे कामावर जात असलेल्या जॉकी फर्नांडिस रा. कारिवडे यांना हुमरस येथे मुख्य रस्त्यावरून जात असताना गवा रेड्याने ठोकर दिलेली होती या अपघातात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान नियमांवर बोट ठेवून त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याची बाब मनसेच्या कानावर नातेवाईकांनी घातली…

Read More

नांदगाव मोरये वाडी येथील सामाईक बंद घराला लागली आग…

कणकवली: नांदगाव मोरये वाडी येथील मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली.या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले.सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात येताना कठीण जात होते.मुंबई गोवा महामार्गावर बिडये कुटुंबियांच्या घराला आग लागली. बिडये कुटूबिय मुंबई येथे वास्तव्यास…

Read More

शिवजयंती निमित्त उद्योजक केदार झाड यांचेकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत छावा चित्रपट…

मालवण प्रतिनिधी:विद्यार्थ्यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांचा धगधगता आणि जाज्वल्य इतिहास समजावा या हेतूने मालवण मधील उद्योजक केदार मिलिंद झाड यांच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा हा ऐतिहासिक चित्रपट शालेय विद्यार्थ्यांसाठी देवबाग येथील मत्स्यगंधा थिएटर येथे मोफत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या…

Read More
You cannot copy content of this page