⚡बांदा ता.०४-: बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या अध्यक्षपदी नारायण शिवराम गायतोंडे तर उपाध्यक्षपदी रुपेश अर्जुन माजगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
२०२५ ते २०३० या कालावधीसाठी निवडण्यात येणाऱ्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक कार्यालयाचे प्रमोद कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव दीपक चव्हाण यांनी काम पाहिले. कार्यकारणी सदस्यपदी राजेश तुकाराम पावसकर, प्रमोद यशवंत देसाई, बापू साबाजी आईर, जयदीपक काशीराम गवस, समीर श्रीकांत पेळपकर, लवू वामन जाधव, सौ यशोदा झिलू सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष श्री गायतोंडे यांनी सलग पंधरा वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. राजकारणासोबतच त्यांचे सामाजिक व सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच त्यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांना दरवर्षी बोनस रकमेचे वाटप होते. सन २०१८-१९ मध्ये ३ लाख ५० हजार रुपये, १९-२० मध्ये ३ लाख ५५ हजार रुपये, २०-२१ मध्ये ४ लाख ८८ हजार रुपये, २१-२२ मध्ये ६ लाख ७८ हजार रुपये, २२-२३ मध्ये ९ लाख ६० हजार रुपये बोनस रकमेचे वाटप करण्यात आले. या संस्थेत दिवसाला सरासरी ६५० लिटर दुधाचे संकलन होते. दुधाची विक्री करून उरलेले दूध हे गोकुळ संघास दिले जाते.
कोट:-
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही दूध संस्था कार्यरत असून दुधाचे संकलन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना आकस्मिक कर्ज देणे तसेच दुग्ध उत्पादन वाढीसाठी शासनाच्या विविध योजना राबवणे यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्नशील आहोत. ही दूध संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट दूध संस्था बनवण्याचा आमचा मानस आहे.
— नारायण गायतोंडे, अध्यक्ष
फोटो:-
बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्थेच्या नूतन कार्यकारणीसह उपस्थित असलेले मान्यवर व निवडणूक अधिकारी.