मत्स्यशेतकरी भाजप प्रदेशाध्यक्ष बनल्याने महाराष्ट्राला नीलक्रांती अनुभवण्यास मिळेल: रविकिरण तोरसकर…
⚡मालवण ता.०२-: आमदार रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने एक मत्स्य शेतकरी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाला आहे. मत्स्य शेतीमधील आणि मत्स्य व्यवसायामधील खाचखळगे माहीत असलेला एक दृष्टा नेता प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे महाराष्ट्राला नीलक्रांती लवकरच अनुभवण्यास मिळेल, अशी आशा भाजपचे मच्छिमार सेल जिल्हा संयोजक व नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली…
