बांदा पुलावर कार ओहोळात कोसळली…
⚡बांदा ता.०३-: मुंबई गोवा महामार्गावर बांदा बसस्थानक नजीक असलेल्या दुसऱ्या पुलावरून भरधाव वेगात असलेली कार ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. हा अपघात रात्री एक वाजताच्या सुमारास झाला. ओहोळ तुडुंब भरला असून कार मध्ये कोणी असण्याची शक्यतेने एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.आज सकाळी ही घटना येथील नजीकच असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत पांगम यांच्या निदर्शनास आली….
