Global Maharashtra Breaking News

नेरूर-साईगाव येथे मादी बिबट्या मृतावस्थेत…

मृत्यूचे नेमके कारण गुलदस्त्यात.. कुडाळ : तालुक्यातील नेरूर तर्फ हवेली मध्ये साईगाव येथे मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला. साईगांव येथील रहिवासी सुर्यकांत भिकाजी कुंभार यांनी याबाबत वन विभागाला खबर दिल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी जात पाहणी केली. बिबट्याचे शव आकेरी येथील वनविश्रामगृह येथे आणून त्याचे पशुवैदयकिय अधिकारी कुडाळ यांच्या मार्फत शिविच्छेदन करून त्याचे दहन करण्यात आले. दरम्यान मृत्युचे…

Read More

संतोष करलकर खून प्रकरणी संशयितांना न्यायालयीन कोठडी…

⚡कुडाळ ता.०६-: तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडीत येथील संदीप करलकर खून प्रकरणी रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (४०) व शैलेश दत्ताराम करलकर (४३) या दोन सख्या भावांसह कामगार शामसुंदर वाड्येकर याला गुरुवारी कुडाळ न्यायालयासमोर हजर केले असता १५ दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तिन्ही आरोपीची आज पोलीस कस्टडी संपली होती. तपासात नवीन मुद्दा नाही असे तयासीक अंमलदार…

Read More

शाळेच्या प्रगतीसाठी वरिष्ठस्तरावरून प्रयत्न…

मनिष दळवी:श्री देव रवळनाथ विद्यामंदिर शाळा नं.१ चा वर्धापनदिन सोहळा थाटात साजरा.. ⚡वेंगुर्ला ता.०६-: ग्रामीण भागातील शाळा या शिक्षणाचा पाया असतो. त्यामुळे अशा शाळांमधून शिक्षण घेतलेली मुले पुढे संस्कारक्षम बनतात. मातोंड येथील नं .१ शाळेला आज १२० वर्षे पूर्ण झाली. या शाळेने हजारो विद्यार्थी घडवले आहेत. या शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यास मी तयार आहे….

Read More

अखेर तारामुंबरी मिठमुंबरी सागरी सेतू वरून धावली लालपरी…

प्रवासी वर्गातून होतेय पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष अभिनंदन.. ⚡देवगड ता.०६-:सिंधुदुर्ग पर्यटनाला महत्त्वाचा दुवा ठरलेला व दोन पर्यटन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा असा तारामुंबरी मिठमुंबरी खाडीवरील फुल हा पर्यटनाचा सागरी सेतू म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र या पुलावरून सर्व वाहतूक सुरु झाली होती. उणीव होती ती फक्त प्रवासी एस टी वाहतुकीची. या पुलावरून लालपरी धावावी अशी गेले…

Read More

भाजप नेते भैय्याजी जोशी यांच्या मराठी द्वेषी वक्तव्याचा मालवणमध्ये शिवसेनेने केला निषेध…

मा.आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी छेडले आंदोलन.. ⚡मालवण ता.०६-: भाजप पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईची भाषा मराठी नाही, मुंबईतील घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे संतापजनक वक्तव्य केले.त्यांनी आपल्या वक्तव्यातून मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. भाजप पक्षाची हीच…

Read More

विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी ता ६राज्‍य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठीजिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्‍याग्रह आंदोलन करण्यात आले .शासन विरोधी घोषणानी परिसर दणानुन सोडला. राज्‍य सरकारी, निमसरकारी, जिल्‍हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका , नगरपरिषद कर्मचारी अश्या विविध संघटना एकत्र येत समन्‍वय समितीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या कड़े लक्ष वेधले ….

Read More

प्रश्न सोडविण्यासाठी रिक्षा चालकांनी एकत्रित लढा देवूया:-नागेश ओरोसकर…

सिंधुदुर्गनगरी ता ६रिक्षा चालक-मालक यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा रिक्षा चालक-मालक सेवा संघ, अविरत कार्यरत राहील. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकानी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन रिक्षा चालक-मालक सेवा संघाचे अध्यक्ष नागेश ओरोसकर यांनी केले. ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिर येथे आज अध्यक्ष नागेश ओरोसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रिक्षा चालक-मालक…

Read More

सुरंगपाणी येथे आमलकी एकादशी निमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.०६-:श्री आमलकी एकादशीचे औचित्य साधून, विठ्ठल पंचायतन देवस्थान खानोली सुरंगपाणी आणि स्वरसंगीत प्रसादिक भजन मंडळ हरिचरणगिरी- कोंडुरा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ८ व रविवार दिनांक ९ मार्च रोजी रोजी सायंकाळी ७ वाजता ही स्पर्धा श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान, सुरंगपाणी या ठिकाणी होणार आहे.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक…

Read More

महिला दिनानिमित्त स्वच्छतेत काम करणाऱ्या महिलांचा सत्कार…

तालुका, ग्राम पातळीवर आयोजन:प्रकल्प संचालक विशाल तनपुरे यांची माहिती. ओरोस ता ६स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ व जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाणी, स्वच्छता क्षेत्रात अंमलबजावणी करिता महिलांचे अमुल्य योगदान आहे. त्यामुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वच्छता क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात पाणी व स्वच्छता क्षेत्रात काम…

Read More

चिमणी पाखर डान्स अकॅडेमिचा १५ मार्च ला नृत्य सन्मान सोहळा…

नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांची प्रमुख उपस्थिती :निलेश उर्फ बंड्या जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर.. ⚡कुडाळ ता.०६-: चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ यांच्या वतीने शनिवार दि. १५ मार्च २०२५ रोजी नृत्य सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे सायंकाळी पाच वाजता फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांच्या…

Read More
You cannot copy content of this page